सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2016- 2017 ते 2023-24 पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑफलाईन पद्धतीने रार्वावण्यान आलेली आहे. तथापि सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सदरील योजना फक्त ऑनलाईन पद्धतीनंच राबविण्यात येत असून त्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टल द्वारे अर्ज स्विकारण्यासाठी दि.16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत होती. तथापि विद्यार्थ्याचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टल वरती अर्ज भरण्यासाठी दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली असून शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहरातील व सोलापूर महानगरपालिका हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र नवीन व नुतनीकरण (New & Renewal) झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टल वर दि.31 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड