नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत पराभवाचे धनी झालेल्या अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला.
सातवेळा बाजार समितीच्या मासिक सभेला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सदस्यत्व रद्द झाल्याबाबतचे आदेश बाजार समिती प्रशासनाला आदेश प्राप्त झाले. बाजार समितीचे मतदार असलेले धर्मा शेवाळे यांनी याबाबतची तक्रार दि. २३ ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे सातत्याने मासिक सभांना गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई ही सहकारह उपनिबंधकानी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI