नाशिक : खाजगी सावकाराच्या घरी सहकार विभागाचा छापा
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने विनापरवाना सावकारी करणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून घर झडतीमध्ये सुमारे दहा लाख वीस हजार रुपये रोकड आणि सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा द
नाशिक : खाजगी सावकाराच्या घरी सहकार विभागाचा छापा


नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।

सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने विनापरवाना सावकारी करणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून घर झडतीमध्ये सुमारे दहा लाख वीस हजार रुपये रोकड आणि सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहकारी उपनिबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक मंगेश मधुकर वैष्णव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी दिनेश सुरेश नाचन (रा. त्रिमूर्तीनगर, नाशिकरोड) हा खासगी सावकार असून, त्याच्याविरुद्ध रामदास दशरथ मोघल (रा. मु. पो. कोठुळे, ता. निफाड) यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार सहकारी संस्था पिंपळगाव बसवंत येथील पथक प्रमुख लेखापरीक्षक संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य लिपिक मंगेश वैष्णव, लेखापरीक्षक सुनील कुवर, वरिष्ठ लिपिक सुरेखा पाळदे, सोयगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव ज्ञानेश्वर कदम, लिपिक अशोक घोटेकर यांच्या पथकाने दिनेश नाचन याच्या राहत्या घरी धाड टाकण्याची कारवाई सुरू केली.

पथकाने तपासणी कार्यवाही पूर्ण करून जप्त दस्तऐवज व पंचनाम्याच्या प्रती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, निफाड यांच्या कार्यालयास सादर केले आहे. खासगी सावकार दिनेश नाचन याच्या राहत्या घरी तक्रारदार मोघल यांनी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे निफाड अर्बन बँकेचा स्वाक्षरी असलेला व दिनांक नसलेला कोरा धनादेश, तसेच फिर्यादीसोबतच्या यादीप्रमाणे अन्य व्यक्तींचे कोरे धनादेश, विसार पावत्या व अन्य दस्त गैरअर्जदार यांच्या घरझडतीच्या पंचनाम्याच्य दरम्यान आढळून आल्या. पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान घेण्यात आलेल्या घरझडतीत नाचन याच्याकडे रोख १० लाख २- हजार ३०० रुपये, सोन्याचा गोफ चार सोन्याच्या अंगठ्या, चांदीच करंडा, चांदीचा छल्ला, चांदीचे वा दहा नग, चांदीचा दिवा, सोन्याच वेढा असा ऐवज आढळून आला. या प्रकरणी खासगी सावकार दिने सुरेश नाचन याच्या विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन् दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande