डॉ. मनमोहन सिंह यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला : राज्यपाल
मुंबई, 27 डिसेंबर, (हिं.स.)।महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपट
डॉ. मनमोहन सिंह यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला : राज्यपाल


मुंबई, 27 डिसेंबर, (हिं.स.)।महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते.

अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले.

डॉ. मनमोहन सिंह विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे.

या दुःखद प्रसंगी मी आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande