दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
मुंबई, २६ डिसेंबर (हिं.स.) : डॉ मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या
दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


मुंबई, २६ डिसेंबर (हिं.स.) : डॉ मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande