अमरावती27 डिसेंबर (हिं.स.) :अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्व असते. २०२५ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल आहे. २०२५ वर्षात दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे, ११ उल्कावर्षाव, सूपरमून, धूमकेतू, ग्रह- ताऱ्यांची युती-प्रतियुती, ग्रह दर्शन, त्यांचे उदयास्त, राशी भ्रमण अशा अनेक खगोलीय घटनांची मेजवानी आकाश निरीक्षणप्रेमींना मिळणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे.३ जानेवारी रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर कमीत कमी राहील. या घटनेला खगोलशास्त्रात 'पेरेहेलिऑन' असे म्हणतात. ४ जानेवारी रोजी शनि ग्रह काही वेळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. या घटनेला खगोलशास्त्रात 'पिधानयूती' असे म्हणतात. २० जानेवारीला शुक्राजवळ शनि दिसेल.
२ फेब्रुवारी रोजी शुक्र व चंद्राची यूती राहील. ८ फेब्रुवारी रोजी पहाटे 'नरतुरंग उल्का वर्षाव' पाहता येईल. ८ मार्च रोजी पश्चिम क्षितीजावर सायंकाळी बुध ग्रह दिसेल. १४ मार्च रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे भारतातून दिसणार नाही. २० मार्च रोजी दिवस व रात्र सारखी राहील.
६ एप्रिल रोजी चंद्राजवळमंगळदिसेल. २२ व २३ एप्रिल रोजी उल्का वर्षाव दिसेल. ४ मे रोजी मंगळव चंद्राची यूती राहील. २४ मे रोजी शनि ग्रह काही काळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. २१ जूनचादिवस मोठा राहील, हादिवस १३ तास १३ मिनीटांचा राहील. रात्रलहान राहील. ४ जुलै रोजी पृथ्वी- सूर्य हे अंतर जास्तीत जास्त राहील. ४ ऑगस्ट रोजी जेष्ठ तारा व चंद्र यांची पिधानयूती राहील. १२ ऑगस्ट रोजी उल्का वर्षाव राहील. ७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण राहील. है भारतातून दिसेल. २१ सप्टेंबर रोजी शनि पृथ्वीच्या जवळ राहील. २२ सप्टेंबर रोजी दिवस वरात्र सारखी राहील.
८ ऑक्टोबर रोजी 'कालेय तारकासमूहातून' उल्का वर्षाव होईल. १७ व १८ नोव्हेंबर रोजी 'लिओनिड्स' उल्का वर्षा होईल. २१ नोव्हेंबर रोजी यूरेनस पृथ्वीच्या जवळराहील. १४ डिसेंबरप रोजी 'जेमेनिड्स' उल्का वर्षाव होईल. २१ डिसेंबर रोजी दिवस लहान राहील. १० तास ४७ मिनीटांचा राहील. वरील सर्व घटना या नैसर्गिक आहे. याचा राशीनुसार मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामूळे कर्मकांडाच्या मागे न लागता या विलोभनीय खगोलीय घटनांचे निरीक्षण करुन याचा आनंद घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म.गिरुळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी