गणेशोत्सव देखाव्यातून ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक कार्य जोपासण्याचे कार्य : नगर मनपा आयुक्त 
अहिल्यानगर, 26 डिसेंबर (हिं.स.)। गणेश उत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक,पौराणिक कार्य देखाव्याच्या माध्यमातून समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम होत असते. आपली संस्कृती परंपरा खूप महान असून त्याची माहिती आजच्या युवा पिढीला होणे गरजेचे आहे.जंगूभाई त
गणेशोत्सव देखाव्यातून ऐतिहासिक,धार्मिक,पौराणिक कार्य जोपासण्याचे कार्य


अहिल्यानगर, 26 डिसेंबर (हिं.स.)।

गणेश उत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक,पौराणिक कार्य देखाव्याच्या माध्यमातून समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम होत असते. आपली संस्कृती परंपरा खूप महान असून त्याची माहिती आजच्या युवा पिढीला होणे गरजेचे आहे.जंगूभाई तालीम ट्रस्टचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गणेश उत्सव काळातील देखावा पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता लागलेली असते.यावर्षीचा प्रतापगडचा रणसंग्राम हा जिवंत देखावा गणेश भक्तांचे आकर्षण ठरले असल्यामुळे जिवंत देखावा गटातून मनपाच्या प्रथम क्रमांक सन्मानित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

अहिल्यानगर मनपा गणेश उत्सव देखावा स्पर्धेत श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ,जंगुभाई तालीम ट्रस्टचा प्रतापगडचा रणसंग्राम या जिवंत देखाव्याला प्रथम पारितोषिक आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते देण्यात आले.

जंगूभाई तालीम ट्रस्टला सुमारे ५५ वर्ष पूर्ण झाले असून गणेश उत्सवाच्या काळात ट्रस्ट ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.याचबरोबर वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असून विविध जाती धर्माचे लोक एकत्र येत भक्ती-भावाने गणरायाला निरोप दिला जातो,असे मत ट्रस्टचे अध्यक्ष राजू मामा जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande