वान्मथी सी. यांनी स्वीकारला वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार
वर्धा, 26 डिसेंबर (हिं.स.)। शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिक येथे आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वान्मथी सी. यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर निय
वान्मथी सी. यांनी स्वीकारला वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार


वर्धा, 26 डिसेंबर (हिं.स.)।

शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिक येथे आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वान्मथी सी. यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी 10.30 वाजता नवनियुक्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.

तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील त्या मूळ रहिवासी आहेत. वान्मथी सी. या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या बॅचच्या असून त्यांनी 152 वी रँक प्राप्त केली होती. आयएएस रँक मिळाल्यानंतर त्यांनी यापुर्वी नंदूरबार येथे 2018-2019 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणुन सेवा दिली. जुलै 2019 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर त्यांची बदली राज्य कर सहआयुक्त या पदावर करण्यात आली. राज्य शासनाने त्यांची वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणुन बदली केली असून आज त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.

प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी वान्मथी सी. यांचे चरखा देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, विश्वास सिरसाट, वंदना सवरंगपते, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, तहसिलदार संदीप पुंडेकर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande