वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो
मुंबई , 26 डिसेंबर (हिं.स.)।जगभरात काल सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला.सर्वसामान्यांप्रमाणे कलाविश्वातील तारे-तारकाही ख्रिसमससाठी जय्यत तयारी करत असतात. काही सेलिब्रिटी यावर्षी आई-बाबा झाले, त्यांनी आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला
प्लास्टिक


मुंबई , 26 डिसेंबर (हिं.स.)।जगभरात काल सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला.सर्वसामान्यांप्रमाणे कलाविश्वातील तारे-तारकाही ख्रिसमससाठी जय्यत तयारी करत असतात. काही सेलिब्रिटी यावर्षी आई-बाबा झाले, त्यांनी आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. दरम्यान, सगळीकडे ख्रिसमचा उत्साह असताना अभिनेता वरुण धवननेही आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला आहे. शिवाय या निमित्ताने अभिनेत्याने त्याची लेक लाराची पहिल्यांदाच झलक दाखवली आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल जून २०२४ मध्ये आई-बाबा झाले. त्यांनी ३ जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांना मुलगी झाली. त्यांच्या मुलीचं नाव लारा आहे.लारा आता ६ महिन्यांची झाली आहे. नताशा किंवा वरुणने मुलीचा फोटो आतापर्यंत शेअर केला नव्हता. ख्रिसमसच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्यांनी लाराबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ‘मी विथ माय बेबीज. मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शन देत वरुणनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. फोटोमध्ये त्याची पत्नी नताशाकडे मुलगी दिसते आहे तर वरुणच्या जवळ त्याचा पाळीव श्वान दिसतोय. दरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर बेबी लाराचा फोटो पोस्ट करताना तिच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावला आहे. वरुणनने शेअर केलेला हा फॅमिली फोटो खूपच चर्चेत आहे.

अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेला बेबी जॉन हा त्याचा बहुचर्चित सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत साउथ क्वीन किर्ती सुरेशसह वामिका गब्बी महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande