सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूरकरांना बंगळूरला जाण्यासाठी बंगळूर-कलबुर्गी-बंगळूर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे सोलापूरकर प्रवाशांना बंगळूरला जाऊन सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, दक्षिण-पश्चिम रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर आणि कलबुर्गी स्थानकांदरम्यान ख्रिसमस नंतरच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक दिशेने दोन फेर्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवणार आहे. बंगळूर-कलबुर्गी एक्स्प्रेस विशेष बंगळूर येथून 27 आणि 28 डिसेंबरला रात्री 9.15 वाजता सुटेल. दुसर्या दिवशी सकाळी 7.40 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने कलबुर्गी-बंगळूर एक्स्प्रेस कलबुर्गी येथून 28 आणि 29 डिसेंबरला सकाळी 9.35 वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 8.00 वाजता बंगळूरला पोहोचेल. या गाडीस दोन्ही दिशांना येलाहंका, धर्मावरम, अनंतपूर, गुंटकल, अडोनी, मंत्रालयम रोड, रायचूर, कृष्णा, यादगीर आणि शहाबाद हे थांबे असतील. या गाडीस तीन एसी थ्री-टीयर कोच, तीन द्वितीय श्रेणीचे स्लीपर क्लास कोच, नऊ द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन लगेज कम ब्रेकव्हॅन अपंगांसाठी अनुकूल डब्यांसह असतील.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड