दिनदर्शिकेच्या माध्यमातून सभासदांना पतसस्थेचा लेखाजोखा सादर
अहिल्यानगर, 28 डिसेंबर (हिं.स.):- मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सालाबाद प्रमाणे २०२५ या वर्षाचे दिनदर्शिका तयार केली असून सभासदांना याद्वारे संचालक मंडळांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती देत लेखा जोखा सादर केला जातो.यामुळे पारदर्शकता येत असून
दिनदर्शिकेच्या माध्यमातून सभासदांना पतसस्थेचा लेखाजोखा सादर


अहिल्यानगर, 28 डिसेंबर (हिं.स.):- मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सालाबाद प्रमाणे २०२५ या वर्षाचे दिनदर्शिका तयार केली असून सभासदांना याद्वारे संचालक मंडळांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती देत लेखा जोखा सादर केला जातो.यामुळे पारदर्शकता येत असून एकमेकांमध्ये विश्वास संपादन केला जात असतो.दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाचे नियोजन करता येत असते.याचबरोबर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी,सण उत्सव धार्मिकतेची माहिती सभासदांना व्हावी यासाठी दरवर्षी दिनदर्शिका घरपोच दिली जाते,असे प्रतिपादन चेअरमन बलराज गायकवाड यांनी केले.

अहिल्यानगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था २०२५ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन चेअरमन बलराज गायकवाड,व्हाईस चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी चेअरमन बलराज गायकवाड बोवलत होते.ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर,सतीश ताठे,शेखर देशपांडे,विकास गीते,अजय कांबळे,किशोर कानडे,गुलाब गाडे,सोमनाथ सोनवणे,कैलास चावरे,विजय कोतकर,संचलिका प्रमिला पवार,उषा वैराळ ,कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.अहिल्यानगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे २०२५ वर्षाची दिनदर्शिका नक्कीच सभासदांना आवडेल याचबरोबर पतसंस्थेतील कारभाराची माहिती दिली असल्याची माहिती व्हाईट चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांनी यावेळी

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande