कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
भंडारा, 29 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज, रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मीराबा
नाना पटोले आई


भंडारा, 29 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज, रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर दुपारी भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande