हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य
हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X समाज माध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना, ते लिहितात:

“2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन! तिचे धैर्य आणि निर्धार लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

हा विजय आणखी ऐतिहासिक आहे कारण हे तिचे दुसरे जागतिक जलदगती विजेतेपद आहे आणि अशी अभूतपूर्व कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande