जर तुम्ही हिंदू असाल आणि बांगलादेशात रहात असाल तर ही पृथ्वीवरील नरकाची जिवंत व्याख्या आहे. 1946 च्या नोआखली दंगलीने बांगलादेशात हिंदूंविरुद्ध मुस्लिम हिंसाचाराची सुरुवात केली, जी आजही सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणारे जघन्य गुन्हे जगभरातील सर्व हिंदूंसाठी एक इशारा आहे. मी हे का म्हणत आहे? तथाकथित मानवतावादी गट किंवा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, विशेषत: अनेक बॉलीवूड तारे, गाझा, सीरिया, लेबनॉनमध्ये जे घडत आहे त्याचा निषेध करण्यासाठी वेळ काढतात, परंतु पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आता बांगलादेशात हिंदू अत्याचाराविरुद्ध कधीच निषेध करताना दिसत नाही. पाकिस्तानातही हिंदूंवरचे अत्याचार काही संपत नाहीत. जरी आपण 1921 चा मोपला नरसंहार किंवा 1990 चा काश्मीर हिंदू नरसंहार पाहिला नसला तरी अफगाणिस्तान आणि बांगलादेशात आपण दररोज हिंदूंवर अत्याचाराचे साक्षीदार आहोत.
मोहम्मद युनूस आणि डीप स्टेट हिंदूंच्या विरोधात कसे काम करत आहेत?
काही तथाकथित मानवतावादी, अनेक भारतीय राजकीय पक्ष आणि स्वार्थासाठी दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्या काही देशांसाठी हिंदू असणं अयोग्य आहे का? नोबेल शांतता पारितोषिक विजेते बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नाकाखाली होणारे अत्याचार हे उर्वरित जगासाठी एक इशारा आहे की दहशतवाला समर्थन करणाऱ्या आणि मानवताविरोधी माणसाला शांततेचा नोबेल पुरस्कार कसा दिला गेला. मोहम्मद युनूस हा शांतता प्रस्थापित करणारा नसून मानवतेचा खुनी आहे. त्यांचे नोबेल पारितोषिक रद्द करावे का? अमेरिकेचे डीप स्टेट कसे मोहम्मद युनूसचा वापर करून बांगलादेश आणि हिंदूंना कमकुवत करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे. अमेरिकेसाठी किंवा मानवतेसाठी कोणतेही चांगले हेतू नसलेल्या या डीप स्टेट घटकांवर डोनाल्ड ट्रम्प आक्रमक कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. पाकिस्तान हा बांगलादेशचा सर्वात मोठा शत्रू आहे, परंतु युनूसचे पाकिस्तानशी असलेले संबंध दहशतवाद्यांबद्दलची सहानुभूती आणि भारतविरोधी भूमिका दर्शवतात. हिंदू संत, आणि व्यावसायिकांनी बांगलादेशच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम केले, कठीण काळात मोठ्या संख्येने मुस्लिमांना मदत केली. मात्र, याच व्यक्तींचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. हिंदूंनी हा आकृतिबंध आणि वैचारिक पैलू खरोखर समजून घेतले पाहिजेत; सोप्या भाषेत सांगायचे तर शत्रूबोध असणं खूप महत्वाचं आहे.
अनेक राजकीय पक्षांचे, विशेषत: अनेक इंडी पक्षांचे, हिंदूंविरुद्धच्या अत्याचारांबद्दल मौन असतात, सर्व हिंदूंना एक स्पष्ट संदेश यातून मिळतो: तुम्ही या पक्षांसाठी निवडणुकीचे एक साधन आहात, आणि जर तुम्ही या शक्तींविरुद्ध एकजूट झाला नाही तर, तुम्ही पुन्हा गुलाम व्हाल. हे पक्ष हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे समर्थन करत आहेत का? बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर टीका करताना कधी हिंदूंनी ऐकले आहे का? फक्त काही मोजक्या सेलिब्रेटींनी केलेली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही करोडो हिंदूंचे घर आहे. तथापि, बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधात मुस्लिम कट्टरतावाद्यांनी केलेल्या क्रूर हिंसाचाराबद्दल चिंता किंवा तिरस्काराचे आवाज फारच कमी आहेत. भारतातील काही मीडिया आउटलेट्स अशा अत्याचारांवर चर्चा किंवा हायलाइट करत आहेत. हिंदूंनो, हे लक्षात ठेवा की, आपण कधीही कोणावर अन्याय केला नाही आणि भविष्यातही करणार नाही, तथापि, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वस्वी हिंदू एकता मजबूत करणे, कोणत्याही अत्याचाराविरुद्ध संघटित होणे, बालपणापासून स्वसंरक्षण तंत्रासह सनातन संस्कृतीचे पालन करणे. संपूर्ण संत समुदायासाठी, लाखो अनुयायांसह, जगाला हे दाखवण्यासाठी की आम्ही हिंदूंवर कोणताही अन्याय किंवा मानवतेच्या विरोधात काहीही खपवून घेणार नाही. जगाला हिंदूंचे सामर्थ्य पाहू द्या. सनातन धर्म हा कोणत्याही धर्मविरोधी नाही, तर मानवतेसाठी कार्य करून जागतिक शांतता वाढवण्याची क्षमता त्यात आहे. सनातन धर्माची हानी मानवतेची आणि जागतिक शांततेची हानी आहे. त्यामुळे जगातील प्रत्येकाने ज्यांना शांतता हवी आहे त्यांनी युनूस सरकार आणि तेथील लोकांनी हिंदूंवर केलेल्या गुन्ह्यांचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. युनूसला समजू द्या की तो डीप स्टेटच्या पाठिंब्याने मानवजातीविरुद्ध काम करू शकत नाही.
हिंदूंच्या स्थितीकडे जगाने कसे पाहावे?
ब्रिटीश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा, तसेच इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात टाकल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ होऊ नये. ब्लॅकमनने यूकेच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला, अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येची दुर्दशा अधोरेखित केली, त्यांनी सांगितले आहे की हिंदूंची घरे आणि मंदिरांची जाळपोळ आणि प्राणघातक हल्ल्यांसह हिंसाचाराचा समावेश आहे. बांगलादेशातील एका हिंदू साधूच्या अटकेवर बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटनच्या संसदेत प्रश्न उपस्थित केला. बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्याच्या प्रयत्नाला 'हिंदूंवर थेट हल्ला' असं ते म्हटले. जगाला हे माहित असणे आवश्यक आहे की भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित आहेत आणि प्रगती करत आहेत, कारण हिंदू बहुसंख्य आहेत. हिंदू बहुसंख्य नसताना काय होते हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दर्शवतात. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सक्तीचे धर्मांतर, खून, बलात्कार आणि देशातून हाकलून दिल्याने अल्पसंख्याक लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मानवतावादी संघटना, विचारवंत आणि राजकीय नेते हिंदू अल्पसंख्याकांच्या या सर्वात वाईट परिस्थितीकडे डोळेझाक करत आहेत का? भारतात याच्या उलट घडत आहे, जिथे बहुसंख्य हिंदू अल्पसंख्याकांना जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रगती करायला मदत करत आहेत.
भारतात संविधान सुरक्षित का आहे?
संविधानाची मूळ वस्तुस्थिती अशी आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे जातीच्या आधारावर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी आणि डीप स्टेट प्रत्यक्षात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेला विरोध करतात असे मानायचे का? त्यांना हिंदूंची संस्कृती कमकुवत का करायची आहे? हिंदूंनी व्यापक संशोधन आणि विश्लेषण केले पाहिजे. ते निःसंशयपणे हिंदू ऐक्याचे महत्त्व आणि विभाजित हिंदू समुदायाचे वाईट परिणाम जाणून घेतील.
हिंदूंनो, कृपया लक्षात ठेवा, “एक है तो सुरक्षित है, बटेंगे तो कटेंगे”
पंकज जगन्नाथ जयस्वाल
७८७५२१२१६१
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी