अश्विन शेठ ग्रुपकडून घर खरेदीदारांसाठी होळी विशेष सवलत जाहीर
मुंबई, 24 मार्च (हिं.स.) भारतातील एक प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर, अश्विन शेठ ग्रुप (ASG), यांनी ह
भारतातील एक प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर, अश्विन शेठ ग्रुप (ASG), यांनी होळीच्या सणाच्या निमित्ताने मुंबईतील निवडक


मुंबई, 24 मार्च (हिं.स.) भारतातील एक प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर, अश्विन शेठ ग्रुप (ASG), यांनी होळीच्या सणाच्या निमित्ताने मुंबईतील निवडक मालमत्तांवर एक खास होळी सवलत जाहीर केली आहे. कंपनी अंतर्गत सध्या चालू असलेल्या सर्व प्रकल्पांवर ही सवलत २४ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये लागू होईल.

भारतात लोकप्रिय असलेल्या होळी या हिंदू सणाला विशेष धार्मिक महत्त्व देखील आहे. एवढेच नाही तर हिवाळ्याच्या रुक्ष दिवसांच्या अखेरीस आणि उत्सवी, आनंदी वसंताच्या आगमनाची चाहूल लागत असताना होळी हा रंगीबेरंगी सण येतो व लोकांचे आयुष्य चैतन्यमय, रंगीत व आनंदी बनवतो. अश्विन शेठ ग्रुपने (ASG) त्यांच्या सेंट्रल पट्ट्यामधील प्रकल्पांमध्ये २ बीएचके, ३ बीएचके, ४ बीएचके आणि ५ बीएचके असणाऱ्या सदनिकांवर खरेदीदार रु.१२ लाखांपर्यंत बचत करू शकतील अशी खास सवलत दिली आहे. अश्विन शेठ ग्रुपने (ASG) आपल्या कांजूरमार्गमधील अॅवंते, मुलुंडमधील मोंटाना, ठाण्यातील शेठ झुरी, शेठ वसंत लॉन्स आणि शेठ अॅव्हलॉन लॉन्स

आणि कांदिवलीमधील एडमॉन्ट - ऑरेलिया अश्या विविध प्रकल्पांवर ही विशेष होळी सवलत जाहीर केली आहे.

या विशेष सवलतीबाबत बोलताना अश्विन शेठ ग्रुप (ASG) चे मुख्य विक्री आणि विपणन अधिकारी श्री. भाविक भंडारी म्हणाले, “रिअॅल्टर्स बॉडी क्रेडाई (realtors’ body CREDAI) च्या एका अहवालानुसार, रिअल इस्टेट क्षेत्र २०३४ पर्यंत १.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर आणि साल २०४७ पर्यंत ५.१७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सणासुदीचा काळ अगदी जवळ आला आहे आणि त्याची सुरुवात होळी सारख्या शुभ सणाने होत असल्याने, हा सण एक नवीन सुरुवात वाढ व समृद्धी दर्शवतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी नवीन मालमत्ता मिळवण्याची ही एक उत्कृष्ट वेळ आहे. आम्ही ग्राहक केंद्रित ब्रॅंड म्हणून लोकप्रिय आहोत. यालाच सुसंगत अशी आमची ही मुंबईतील निवडक प्रकल्पांवरील विशेष होळी सवलत ग्राहकांना महत्त्वपूर्ण बचत आणि इतर फायदे मिळवून देण्याची एक रोमांचक संधी प्रदान करते आणि आमच्या ग्राहकांचा घरमालकीच्या दिशेने होणारा प्रवास होळीच्या उत्सवाप्रमाणेच रंगिबिरंगी आणि आनंददायी करते.”

अश्विन शेठ ग्रुप (ASG) या वर्षी एमएमआर भागात आपली व्याप्ती जोमाने वाढवत आहे. या वर्षासाठीचे त्यांचे जे भावी प्रकल्प आहेत ते ग्राहकांचे समाधान, नावीन्यता व कल्पकता याबाबत असलेले कंपनीचे समर्पण आणि गृहखरेदीदार व व्यवसायांच्या नवनवीन निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची असलेली स्वप्नदृष्टी, दुरदर्शीपणा दाखवतात.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande