एसबीआय लाईफने केले 'थँक्स अ डॉट' चे आयोजन
मुंबई, २४ मार्च, (हिं.स) : महिला पोलिसांना सहन करावे लागणारे शारीरिक व मानसिक ताणतणाव लक्षात घेऊन,
एसबीआय लाईफने केले 'थँक्स अ डॉट' चे आयोजन


मुंबई, २४ मार्च, (हिं.स) : महिला पोलिसांना सहन करावे लागणारे शारीरिक व मानसिक ताणतणाव लक्षात घेऊन, एसबीआय लाईफने 'आंतरराष्ट्रीय महिला दिनी' मुंबई पोलीस विभागातील महिला अधिकाऱ्यांसाठी आपल्या 'थँक्स अ डॉट' उपक्रमांतर्गत स्तन कर्करोग जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये एसबीआय लाईफला लायन्स क्लबचे सहकार्य लाभले होते. पोलीस कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये बजावताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो, आणि महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भात ही आव्हाने कैक पटींनी वाढतात, नोकरीतील कर्तव्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये संतुलन साधताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.

स्वतःची काळजी घेणे ही रोजची सवय बनवली जावी यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय लाईफने नाविन्यपूर्ण 'थँक्स अ डॉट हॉट वॉटर बॅग' चे वाटप केले. यामध्ये महिलांना शरीरातील असामान्य गाठी ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाते, स्वतः स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची आठवण करून दिली जाते. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना शमवण्यासाठी जगभरातील महिला हॉट वॉटर बॅगचा वापर करतात, त्याच्या डिझाईनमध्ये एसबीआय लाईफने एक नवीन बदल केला आहे, कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आकार व स्पर्श असलेली गाठ यावर एम्बेड करण्यात आली आहे. याशिवाय स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कंपनीने थँक्स अ डॉट हॉट वॉटर बॅग चे डिझाईन कोणीही ती बॅग बनवू शकेल अशाप्रकारे खुले ठेवले आहे.

एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ श्री अमित झिंगरन, स्तनाच्या कर्करोगातून बऱ्या झालेल्या अभिनेत्री महिमा चौधरी, सहायक पोलिस आयुक्त महेश मुगुटराव, आणि एसबीआय लाईफचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआरचे चीफ श्री रवींद्र शर्मा यांच्यासह लायन्स क्लबच्या सदस्यांसह महिला पोलिस अधिकाऱ्यांना संबोधित केले.

महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, ज्याचा परिणाम त्यांच्या एकंदरीत तब्येतीवर होतो. यापैकी एक खूप मोठे आव्हान म्हणजे स्तनांचा कर्करोग. आपल्याला माहिती आहे की, स्तनांच्या कर्करोगाच्या ६०% केसेस खूप पुढच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. इतर आजार आणि स्तनांचा कर्करोग यातील एक मोठा फरक म्हणजे कोणतीही महागडी वैद्यकीय साधने न वापरता, घरच्या घरी, स्वतः दर महिन्याला काही सोपी पावले उचलून स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करता येते, ज्यामुळे हा आजार खूप आधी लक्षात येऊ शकतो. स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्याची आणि आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी जीवन-रक्षक कौशल्ये शिकवून महिलांना सक्षम बनवण्यासाठी एसबीआय लाईफने अतिशय नाविन्यपूर्ण अशी थँक्स अ डॉट हॉट वॉटर बॅग डिझाईन केली. स्वतः स्तनांची तपासणी करण्याचे, आजार लवकरात लवकर लक्षात येण्याचे महत्त्व समजावून देऊन, स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिलांनी एक जीवन-रक्षक कौशल्य आत्मसात करावे आणि दररोज आपल्या आरोग्याला प्राधान्य देता यावे यासाठी सवयींमध्ये बदल करावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई पोलीस महिला अधिकाऱ्यांना संबोधित करताना, एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ श्री अमित झिंगरन यांनी सांगितले, साहसी मुंबई पोलीस महिला कर्मचाऱ्यांसोबत उभे राहणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आम्ही त्यांच्यासाठी एक असे भविष्य निर्माण करू इच्छितो ज्यामध्ये स्तनांचा कर्करोग हा आजार त्यांचा जीव आणि प्रियजनांची स्वप्ने यासाठी अडसर ठरणार नाही. एसबीआय लाईफचे थँक्स अ डॉट आशेचा किरण आहे, हा उपक्रम देशभरातील महिलांना स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम बनवतो. स्वतः स्वतःची तपासणी नियमितपणे करण्याचे महत्त्व महिलांना पटवून देऊन देशभरात स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकतेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये आम्ही नवी क्रांती घडवून आणू इच्छितो.

त्यांनी पुढे सांगितले, एसबीआय लाईफच्या 'थँक्स अ डॉट' आम्ही महिलांना स्वतः स्वतःची तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देत असतो, त्यांनी स्वतः स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी, जीवन-रक्षक सवयी लावून घ्याव्यात यासाठी त्यांना सक्षम बनवतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतात नोंदवण्यात आलेल्या नवीन केसेसपैकी ३२% स्तन, तोंड आणि सर्व्हायकल कॅन्सरच्या आहेत. भारतात महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाच्या केसेस सर्वात जास्त २६% आणि त्यापाठोपाठ १७% केसेस सर्व्हायकल कॅन्सरच्या आहेत. जगभरात वर्षभरात नोंदवल्या गेलेल्या कॅन्सरच्या नवीन केसेसपैकी १२.५% केसेस स्तनांच्या कर्करोगाच्या होत्या. त्यामुळे स्तनांचा कर्करोग हा जगभरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. युवा महिलांमध्ये याचे प्रमाण कमी आहे, स्तनांच्या आठ इन्व्हेसिव्ह कर्करोगांपैकी जवळपास एक ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये आढळून येतो तर तीनपैकी दोन ५५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आढळून येतात.

स्तनांच्या कर्करोगातून वाचलेल्या अभिनेत्री महिमा चौधरी यांनी सांगितले, मी स्वतः स्तनांच्या कर्करोगाचा सामना केलेला असल्याने हा आजार लवकरात लवकर लक्षात येण्याचे महत्त्व आणि परिणाम मी चांगलेच जाणते. म्हणूनच एसबीआय लाईफचे थँक्स अ डॉट कॅम्पेन माझ्यासाठी खूप जवळचे आहे. स्वतः स्वतःची स्तन तपासणी करण्याची सवय लावून घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व प्रशिक्षण या कॅम्पेनमध्ये महिलांना पुरवले जाते.

आजार लवकरात लवकर लक्षात येण्याचे महत्त्व तसेच स्वतः स्वतःची तपासणी करण्याचे तंत्र महिलांना समजावून सांगणाऱ्या संवादात्मक सत्राबरोबरीनेच, कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई पोलीस महिला कर्मचाऱ्यांना हॉट वॉटर बॅग्सचे वाटप करण्यात आले. जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न भविष्यात देखील सुरु ठेवले जातील आणि स्तनांचा कर्करोग लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी नाविन्यपूर्ण साधने देशभर उपलब्ध करवून दिली जातील अशी प्रतिज्ञा घेऊन एसबीआय लाईफ इन्श्युरन्सने या कार्याप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande