व्होल्टासकडून स्मार्टएअर एसीसाठी 'शोर कम, काम ज्यादा' हे नवे समर कॅम्पेन जाहीर
मुंबई, 24 मार्च, (हिं.स.) भारतात कूलिंग उत्पादनांमध्ये निर्विवादपणे आघाडीवर असलेला, देशातील पहिल्या
व्होल्टासकडून स्मार्टएअर एसीसाठी 'शोर कम, काम ज्यादा' हे नवे समर कॅम्पेन जाहीर


मुंबई, 24 मार्च, (हिं.स.) भारतात कूलिंग उत्पादनांमध्ये निर्विवादपणे आघाडीवर असलेला, देशातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, व्होल्टासने आपल्या स्मार्टएअर एसी सीरिजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष समर कॅम्पेन 'शोर कम, काम ज्यादा' सुरु केले आहे. ग्राहक सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांच्या आधारे हे कॅम्पेन तयार करण्यात आले आहे, या सर्वेक्षणात ग्राहकांनी एसी खरेदी करताना कनेक्टिव्हिटी, आराम आणि सुविधा यांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले आहे.

नवीन व्होल्टास स्मार्टएअर एसी 'सुपर सायलेंट' आहे, यामध्ये अनोखा स्लीप मोड आणि आयओटी कनेक्टिव्हिटी देखील आहे. 'शोर कम, काम ज्यादा' कॅम्पेनमध्ये एसीचे 'सुपर सायलेंट' वैशिष्ट्य अतिशय आगळ्यावेगळ्या व नॉस्टॅल्जीक पद्धतीने अधोरेखित केले आहे.

नवीन व्होल्टास स्मार्टएअर एसी 'सुपर सायलेंट' आहे, यामध्ये अनोखे स्लीप मोड आणि आयओटी कनेक्टिव्हिटी देखील आहे. 'शोर कम, काम ज्यादा' कॅम्पेनमध्ये एसीचे 'सुपर सायलेंट' वैशिष्ट्य अतिशय अनोख्या व नॉस्टॅल्जीक पद्धतीने अधोरेखित करण्यात आले आहे. नवीन एअर कंडिशनर 'सुपर सायलेंट' काम करून ग्राहकांना कूलिंग, सुविधा आणि आराम देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 'सुपर सायलेंट' असल्याने यामध्ये ऑपरेटिंग दरम्यान आवाज खूपच कमी होतो. यामध्ये स्लीप मोड देखील आहे, जो खोलीत झोपलेल्या लोकांच्या बदलत्या बॉडी टेम्परेचरला अनुसरून कूलिंग देतो. नवीन एसी रेंजमध्ये स्मार्टफोनमार्फत (व्होल्टास स्मार्ट ऍपशी कनेक्ट झाल्यावर किंवा ऍमेझॉन अलेक्सा किंवा गूगल होममार्फत) टेम्परेचर कंट्रोल यासारखी अनेक वैशिष्ट्ये असल्याने ही अतिशय अनोखी श्रेणी ठरली आहे.

आता उन्हाळा परत येतोय, पण चिंता नको, कारण उन्हाळ्यात थंडावा मिळवून देण्यासाठी मूर्ती देखील परत येतो. भारतातील नंबर १ एसी ब्रँड व्होल्टासने आपला विनोदी व बुद्धिमान मूर्ती परत आणला आहे. शांत व्यक्तिमत्व आणि मजामस्करी करण्याचा स्वभाव असलेला, सर्वांची मने जिंकणारा मूर्ती व्होल्टास स्मार्टएअर एसीला प्रमोट करण्यासाठी परत आला आहे. व्होल्टासच्या स्मार्टएअर एसीच्या रेंजमध्ये सुपर-सायलेंट ऑपरेशन, नवा स्लीप मोड आणि आधुनिक आयओटी-सक्षम डिझाईन आहे.

नवीन कॅम्पेनमध्ये मूर्ती त्याच्या बडबड्या मेव्हण्यासमोर शांत राहून, त्यांच्या व व्होल्टास एसीच्या आवाजाविना काम करण्याच्या कार्यक्षमतेमधील आश्चर्यजनक अंतर दर्शवतो. 'शोर कम, काम ज्यादा' ही टॅगलाईन कॅम्पेनचा मूळ विचार अतिशय शानदार पद्धतीने दाखवते आणि खूप सहजपणे आपला संदेश पोहोचवते. या अभियानातील दोन रोचक जाहिराती पाहायला खूपच छान आहेत. व्होल्टास स्मार्टएअर एसीसोबत सर्वांचा लाडका मूर्ती हे या कॅम्पेनचे प्रमुख विषय आहेत.

व्होल्टास लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग प्रमुख श्री देबा घोषाल यांनी नवीन कॅम्पेनबद्दल सांगितले, हो, तो परत आलाय आणि यावेळी अगदी शांतपणे, खूपच सहजपणे, अगदी आमच्या नवीन उत्पादनांसारखाच आणि यावेळी तो अजून जास्त मजामस्करी करणारा, अधिक बुद्धिमान व आधुनिक बनलाय. यंदाच्या उन्हाळ्यापासून दिलासा देण्यासाठी आम्ही काय घेऊन येत आहोत याची झलक तुम्हाला या टीजरमधून मिळेल. व्होल्टास एसीना ग्राहकांची पसंती नेहमीच मिळत आली आहे, आणि गेल्या एका दशकामध्ये मूर्ती आमच्या ब्रँडचा चेहरा बनला आहे. पण यावेळी मूर्ती आणि आमची उत्पादने अधिक स्मार्ट तर आहेतच शिवाय शांतपणे स्वतःचे काम करण्यासाठी सक्षम आहेत - शोर कम, काम ज्यादा.

ऑगिल्वी इंडिया (नॉर्थ) च्या सीसीओ श्रीमती रितू शारदा यांनी सांगितले, मूर्तीला परत आणणे खूपच स्वाभाविक होते कारण व्होल्टास आणि मूर्ती यांनी नेहमीच उत्तम कामगिरी बजावली आहे आणि मूर्तीच्या विलक्षण बुद्धीने याआधी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उन्हाळा सुरु झालाय, मूर्तीच्या मेव्हण्याची बडबड गर्मी वाढवेल, तर दुसरीकडे मूर्ती व व्होल्टासचे स्मार्टएअर एसी यांचा थंडावा व शांतपणे काम करण्याची वृत्ती ग्राहकांना दिलासा देईल.

टेलिव्हिजन आणि डिजिटलबरोबरीने हे कॅम्पेन अनेक प्रिंट, रेडियो आणि ओओएचवर देखील चालवले जाईल. यंदाच्या उन्हाळ्यात व्होल्टास मूर्तीसोबत या कॅम्पेनमध्ये आपला ब्रँड अजून मजबूत करण्यासाठी सज्ज आहे.

दरवर्षीप्रमाणे व्होल्टासने आपल्या कॅम्पेनसोबत ग्राहकांसाठी काही फायनान्स प्रोग्राम देखील आणले आहेत. यामध्ये आकर्षक कॅश-बॅक, झीरो डाऊन पेमेंट, एक्स्टेंडेड वॉरंटी आणि फिक्स्ड ईएमआय यासारख्या इतर प्रमोशनल ऑफर्स आहेत. या आकर्षक योजनांचा लाभ घेऊन उत्पादने खरेदी करणे अधिक सहजसोपे होईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande