अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश
* करीना कपूर, करिष्मा कपूर शिवसेनेच्या स्टार प्रचारक मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : अभिनेता गोविंदाने मु
गोविंदा शिवसेना 


* करीना कपूर, करिष्मा कपूर शिवसेनेच्या स्टार प्रचारक

मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. जवळपास १४ वर्षांनंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले आहे. तो मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे

९० च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अर्थात 'हिरो नंबर १' म्हणून गोंविदाला ओळखले जाते.

पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी गोविंदाचे शिवसेनेत स्वागत केले. आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्रदिनी लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो. त्यांचे मनापासून अभिनंदन. ते अतिशय डाऊन टू अर्थ आहेत. ते स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मला कोणतेही निवडणुकीचे तिकीट नको आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान गोविंदाने पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंचे आभार मानले. नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र. मी आदरणीय एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे, ही देवाचीच मिळालेली कृपा आहे. मी २००४ ते २००९ या काळात सक्रीय राजकारणात होतो. त्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला वाटलं होतं की पुन्हा कधीच राजकारणात येणार नाही. पण २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर रामराज्य ज्या पक्षात आहे, तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या कृपेने या पक्षात आलोय. मी त्यांचे आभार मानतो, असे गोविंदा म्हणाला.

गोविंदाने काँग्रेसकडून २००४ ची लोकसभा निवडणूक लढवली. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघावर पकड होती. त्यांनी १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande