मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार
मुंबई, 28 मार्च (हिं.स.) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांचा क
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार


मुंबई, 28 मार्च (हिं.स.) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवणार आहे.

दादर-बलिया त्रिसाप्ताहिक विशेष

ट्रेन क्रमांक 01025 दादर-बलिया त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०३.२०२४ पर्यंत आता दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (४० फेऱ्या)

ट्रेन क्र. 01026 बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत आता दि. ०३.०४.२०२४ ते दि.०३.०७.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (४० फेऱ्या)

दादर-गोरखपूर विशेष आठवड्यातून ४ दिवस

ट्रेन क्रमांक 01027 दादर-गोरखपूर आठवड्यातून ४ दिवस दि. ३१.०३.२०२४ पर्यंत अधिसूचित विशेष ट्रेन आता दि. ०२.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत (दि. ०२.०५.२०२४ वगळता) वाढवण्यात येत आहे. (५१ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01028 गोरखपूर-दादर विशेष ट्रेन दि. ०२.०४.२०२४ पर्यंत आठवड्यातून ४ दिवस अधिसूचित होती, आता दि. ०४.०४.२०२४ ते ०२.०७.२०२४ पर्यंत (दि. १०.०६.२०२४ वगळता) वाढवण्यात येत आहे. (५१ फेऱ्या)

लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष

ट्रेन क्र. 01435 सोलापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष अधिसूचित दि. २६.०३.२०२४ पर्यंत दि. ०२.०४.२०२४ ते दि. २५.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (१३ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस -सोलापूर विशेष अधिसूचित दि. २७.०३.२०२४ पर्यंत पुढे दि. ०३.०४.२०२४ ते दि. २६.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (१३ फेऱ्या)

सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष

ट्रेन क्र. 01437 सोलापूर-तिरुपती विशेष अधिसूचित दि. २८.०३.२०२४ पर्यंत दि. ०४.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (१३ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01438 तिरुपती-सोलापूर विशेष अधिसूचित दि. 29.03.2024 पर्यंत पुढे दि. 05.04.2024 ते दि. 28.06.2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे. (१३ फेऱ्या)

सोलापूर-दौंड दैनिक अनारक्षित विशेष

ट्रेन क्रमांक 01461 सोलापूर-दौंड विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत पुढे वाढवण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01462 दौंड-सोलापूर विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत पुढे वाढवण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

सोलापूर-कलबुर्गी दैनिक अनारक्षित विशेष

ट्रेन क्र. 01463 सोलापूर- कलबुर्गी विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत पुढे दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

ट्रेन क्र. 01464 कलबुर्गी-सोलापूर विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

नागपूर-मडगांव द्वि-साप्ताहिक विशेष

ट्रेन क्रमांक 01139 नागपूर-मडगांव विशेष दि. ३०.०३.२०२४ पर्यंत अधिसूचित आता दि. ०३.०४.२०२४ ते दि. ०८.०६.२०२४ (२० फेऱ्या) पर्यंत धावणार आहे.

ट्रेन क्र. 01140 मडगाव-नागपूर विशेष दि. ३१.०३.२०२४ पर्यंत अधिसूचित आता दि. ०४.०४.२०२४ ते दि. ०९.०६.२०२४ (२० फेऱ्या) पर्यंत धावणार आहे.

पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नियमित विशेष

ट्रेन क्र. 01023 पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत पुढे वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01024 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत पुढे वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

बडनेरा-नाशिक नियमित अनारक्षित विशेष

ट्रेन क्र. 01211 बडनेरा-नाशिक विशेष अधिसूचित दि. दि. ३१.०३.२०२४ पर्यंत दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत पुढे दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

पुणे-हरंगुळ नियमित विशेष

ट्रेन क्रमांक 01487 पुणे-हरंगुळ विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत पुढे दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

ट्रेन क्र. 01488 हरंगुळ-पुणे विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत पुढे दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे. (९१ फेऱ्या)

वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande