निजामुद्दीन राजधानी आणि दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा
मुंबई, 28 मार्च (हिं.स.) : आगामी ३१ मार्च २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुंबई-हजरत निजामुद्दीन र
संग्रहित


मुंबई, 28 मार्च (हिं.स.) : आगामी ३१ मार्च २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा जोडण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने आता या गाड्या कायमस्वरूपी अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्ब्यासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.गाडी क्रमांक : 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १ एप्रिल पासून चालवण्यात येईल.गाडी क्रमांक : 22222 हजरत निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन २ एप्रिलपासून चालवण्यात येईल.

गाडी क्रमांक : 12289 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर १ एप्रिल २०२४ पासून चालवण्यात येईल. तर गाडी क्रमांक : 12290 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २ एप्रिलपासून चालवण्यात येईल. प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासून घ्यावी असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande