बाबासाहेब आंबेडकर : हिंदू धर्म, साम्यवाद, काँग्रेसबद्दलची मतं आणि विश्लेषण
महान देशभक्त आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राशी संबंधित सर्व प्रश्नांवर
Ambedkar 


महान देशभक्त आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राशी संबंधित सर्व प्रश्नांवर स्पष्ट व बोलके होते. कम्युनिस्ट आणि अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांचे चित्रण हिंदू धर्माच्या विरोधात केले असले तरीही, त्यांनी देशाच्या भूतकाळाला व संस्कृतीला तुच्छ लेखले नाही; उलट त्या काळात प्रचलित असलेली अंधश्रद्धाळू प्रथा आणि व्यापक जातीय भेदभाव यांचा त्यांनी तिरस्कार केला. त्यांनी त्यांच्या 'रिडल्स ऑफ हिंदूइझम' या पुस्तकात असेही नमूद केले आहे की, पाश्चात्यांचा असा विश्वास आहे की लोकशाहीचा शोध त्यांनी लावला होता, परंतु हिंदू 'वेदांत' मध्ये त्याबद्दल अधिक ठळक आणि स्पष्ट चर्चा आहेत, जी कोणत्याही पाश्चात्य संकल्पनेपेक्षा जुनी आहे.

बाबासाहेब हे हिंदूविरोधी नव्हते, पण ते हिंदू धर्मातील काही वाईट प्रथा आणि काही अनुचित रूढींच्या विरोधात होते. जर त्यांनी हिंदू धर्माचा द्वेष केला असता तर त्यांनी हिंदू धर्म आणखी कमकुवत करण्यासाठी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता. तथापि, त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण त्यांच्या चालीरिती व तत्वे हिंदू धर्मासारख्याच आहेत. हिंदू धर्माचे अनेक टीकाकार हिंदू धर्माविरुद्ध त्यांच्या काही ओळी उद्धृत करतात, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या त्या काळातील प्रतिक्रिया होत्या आणि प्रतिक्रिया या क्षणभंगुर भावना असतात ज्या एखाद्याचे चरित्र किंवा विचार धारा ठरवू शकत नाहीत. बहुतेक प्रतिक्रिया काही प्रथांविरुद्धच्या रागातून होत्या, त्यामुळे ते हिंदूविरोधी होते असा दावा करणे व्यर्थ आहे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल कठोर शब्द वापरतो तेव्हा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण तसे वागतो कारण त्यामागे प्रेम आणि प्रेमाची भावना असते, जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यावेळची त्यांची कीर्ती आणि सामर्थ्य बघितले तर हिंदूंचे आणि भारताचे लक्षणीय नुकसान करू शकले असते, पण ते देशभक्त होते आणि वस्तुस्थिती जाणून होते. त्यांनी ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्म स्वीकारला असता तर काय झाले असते याची आपण कल्पना करू शकतो का?

त्यांना माहीत होते की प्रत्येक धर्मात आणि विचारसरणीमध्ये काही त्रुटी आहेत ज्या दूर करणे आणि सुधारणे आवश्यक आहे. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी हिंदू पावले उचलतील अशी त्यांना आशा होती, म्हणून त्यांनी हिंदू नेत्यांना सुधारात्मक कृती करण्याची अंतिम मुदत दिली. तथापि, मुघल आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेली हिंदूंमधील तीव्र जातीय विभागणी आणि गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे हिंदूंना सामाजिक विषमतेच्या या समस्येवर त्यावेळी मात करणे अशक्य झाले. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी उभे केलेले अडथळेही हिंदू अधोगतीला कारणीभूत आहेत, असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते. काँग्रेस, कम्युनिझम, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या विरोधात त्यांचे ठाम मत होते. काँग्रेस आणि कम्युनिझमबद्दल त्यांचे विचार पाहू.

कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल ते काय म्हणाले?

“मानवतेला केवळ आर्थिक मूल्ये जपायची नाहीत, तर तिला आध्यात्मिक मूल्येही जपायची आहेत. साम्यवादी हुकूमशाही मानसिकतेने आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष दिले नाही आणि तसे करण्याचा त्यांचा हेतू सुद्धा दिसत नाही. कम्युनिस्ट तत्त्वज्ञान तितकेच चुकीचे वाटते, कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा उद्देश डुकरांना पुष्ट करणे हा आहे, जणू काही डुकरांपेक्षा मानव श्रेष्ठ नाही. मनुष्याने भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे विकास केला पाहिजे. [संदर्भ: खंड 3, बुद्ध किंवा कार्ल मार्क्स, पृष्ठ क्रमांक 461-462]

डॉ.आंबेडकर बरोबरच म्हणाले की, केवळ भौतिकवादावर लक्ष केंद्रित केल्याने स्वार्थ, लोभ आणि संधीसाधूपणा वाढतो. त्यांना मानवतेपासून दूर करतो, मग ते समाज किंवा राष्ट्राला कधीच प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे समाज आणि राष्ट्र कधीही शांती प्रस्थापित करू शकत नाही, म्हणून आध्यात्मिक गुणधर्म व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जग योग्य पद्धतीने तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्य जातीचे उच्चाटन (Annihilation of Caste ) या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितले की कम्युनिस्ट सर्वसमावेशक आर्थिक क्रांतीची अपेक्षा करू शकत नाहीत कारण त्यांनी कामगारांना जातीच्या आधारावर विभागले आहे. समजा, जर ते आर्थिक क्रांती सुरू करण्यात यशस्वी झाले, तर ते पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना जातीचा मुद्दा हाताळावा लागेल. कारण समतेसाठी बंधुभाव लागतो. तथापि, बंधुत्वाच्या अनुपस्थितीत स्वातंत्र्य आणि समानतेची हमी दिली जाऊ शकत नाही, जे जातीआधारित भेदभाव करून प्राप्त करणे अशक्य आहे.

ते म्हणाले, कम्युनिस्ट असे म्हणू शकतात का की त्यांचे मौल्यवान ध्येय साध्य करताना त्यांनी इतर मौल्यवान उद्दिष्टे नष्ट केली नाहीत? त्यांनी खाजगी मालमत्तेचा नाश केला आहे. हे एक मौल्यवान ध्येय आहे हे मान्य करून, कम्युनिस्ट असे म्हणू शकतात का की ते साध्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी इतर मौल्यवान उद्दिष्टे नष्ट केली नाहीत? आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी किती लोक मारले आहेत. मानवी जीवनाची किंमत नाही का? मालकाचा जीव न घेता तुम्ही मालमत्ता घेऊ शकत नाही का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून कै.श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी कामगार आणि शेतकऱ्यांसाठी संघटना स्थापन केली. जातीचा वापर संघटना निर्माण करण्यासाठी केला जाऊ नये कारण ती व्यक्तींना आर्थिक वस्तू बनवते आणि त्यांचा समाज आणि राष्ट्राविरुद्ध हत्यार म्हणून वापर करते. कम्युनिझमने सुरुवातीपासूनच समाजात फूट पाडण्यासाठी आणि हानी पोहोचवण्यासाठी हेच डावपेच वापरले आहेत, त्यामुळेच डॉ.बाबासाहेबांचा तीव्र विरोध होता. साम्यवाद सिद्धांतात चांगला वाटतो पण व्यवहारात तो पूर्णपणे अपयशी ठरतो. साम्यवादाची समस्या म्हणजे 'गोष्टी पूर्ण करण्याचा' त्यांचा मार्ग. तत्त्वांच्या नावाखाली कम्युनिस्ट इतिहासात फेरफार करतील, निरपराध लोकांची हत्या करतील आणि माध्यमांना सेन्सर करतील. नोव्हेंबर 2017 मध्ये एका लेखात, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या लॉरा निकोल म्हणाल्या, आम्ही अशा पीडितांचा इतिहास विसरता कामा नये, ज्यांना समाजातून आवाज मिळाला नाही कारण त्यांच्या कथा लिहिल्यानंतर ते जगले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याला पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळला पाहिजे. त्याचा प्रतिकार केला पाहिजे. ती पुढे म्हणाली की कम्युनिझम हा सध्याच्या परिस्थितीवर हल्ला नाही, तर एक हिंसक सिद्धांत आहे जो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांनी सरकार का सोडले आणि काँग्रेसबद्दल त्यांचे काय मत होते?

डॉ.आंबेडकरांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडली आणि पंडित नेहरू आणि मंत्रिमंडळातील इतर काँग्रेस मंत्र्यांशी मतभेद व्यक्त केले. पंडित नेहरूंच्या काश्मीर प्रश्न हाताळण्याच्या पद्धतीवर त्यांचा आक्षेप, जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणाऱ्या घटनेच्या कलम ३७० ला त्यांचा विरोध, समान नागरी संहितेला त्यांचा पाठिंबा आणि हिंदू कोड बिल अडवल्याबद्दल संसदेतील त्यांची निराशा, या सर्व गोष्टींनी काँग्रेसबद्दल त्यांच वाढत नैराश्य त्यांना वेगळे होण्यास हातभार लावून गेला. डॉ.आंबेडकरांनी काश्मीरच्या विषयावर अनेक प्रसंगी चर्चा केली. 10 ऑक्टोबर 1951 रोजी डॉ. आंबेडकरांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत चिंता व्यक्त करत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. डॉ. आंबेडकरांनी पंडित नेहरूंवर भारतातील मागास हिंदू, अनुसूचित जाती, जमाती आणि पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) येथील लोकांपेक्षा मुस्लिमांना, विशेषत: काश्मीरमधील मुस्लिमांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. शीख, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक गटांवर अनेक अत्याचार झाले, परंतु सरकारने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सरकारने आपले सर्व लक्ष काश्मीरवर आणि मुसलमानांवर केंद्रित केले असे त्यांना जाणवले. डॉ. आंबेडकरांनी फाळणीसह संपूर्ण लोकसंख्येच्या पृथक्करणाचा पुरस्कार केला, परंतु त्यांच्या मताला प्राधान्य देण्यात आले नाही.

काँग्रेस सूर्य-चंद्र असेपर्यंत टिकणार नाही : काँग्रेस किती दिवस टिकणार? काँग्रेस म्हणजे पंडित नेहरू, आणि पंडित नेहरू म्हणजे काँग्रेस. पण, पंडित नेहरू अमर आहेत का? या मुद्द्यांचा विचार करणाऱ्याला काँग्रेस सूर्य-चंद्र असेपर्यंत टिकणार नाही हे कळेल. हे शेवटी संपलेच पाहिजे.

जातीचे शोषण : काँग्रेस नेहमीच जिंकते. पण काँग्रेस का जिंकते, याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस खूप लोकप्रिय आहे, असे उत्तर आहे. पण काँग्रेस लोकप्रिय का आहे? सत्य हे आहे की काँग्रेस नेहमीच मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या जातींचे उमेदवार उभे करते. जात आणि काँग्रेस यांचे जवळचे नाते आहे. जातीव्यवस्थेचे शोषण करूनच काँग्रेस जिंकते.

जेव्हा विशेषज्ञ डॉ. आंबेडकरांचे व्यापक दृष्टिकोनातून आणि निष्पक्ष दृष्टीकोनातून विश्लेषण करू लागतील, तेव्हा लोकांना वास्तवाचे सखोल आकलन होईल आणि लक्षात येईल की त्यांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता, पण त्यांचा खरा हेतू होता तो म्हणजे सामाजिक असमानतेच्या मानसिकतेमध्ये सुधारणा करणे.

या तेजस्वी देशभक्त आणि मानवतेच्या महान नेत्याला विनम्र अभिवादन!!

पंकज जगन्नाथ जयस्वाल

७८७५२१२१६१

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande