युपीएल लि. ला भारतीय ट्रेडमार्क रजिस्ट्रीद्वारे 'वेल नोन ट्रेडमार्क'चा दर्जा
मुंबई, 18 एप्रिल, (हिं.स.) युपीएल लि. या शाश्वत शेती सुविधा पुरवणाऱ्या जागतिक पुरवठादार कंपनीला भारत
युपीएल लि. ला भारतीय ट्रेडमार्क रजिस्ट्रीद्वारे 'वेल नोन ट्रेडमार्क'चा दर्जा


मुंबई, 18 एप्रिल, (हिं.स.) युपीएल लि. या शाश्वत शेती सुविधा पुरवणाऱ्या जागतिक पुरवठादार कंपनीला भारतीय ट्रेडमार्क रजिस्ट्रीने ‘वेल नोन ट्रेडमार्क’चा दर्जा दिला आहे. या प्रतिष्ठित श्रेयनिर्देशामुळे युपीएलचे भारतातील आघाडीच्या अॅग्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक कंपनी असल्याचे बाजारपेठेतील स्थान आणखी मजबूत झाले असून पर्यायाने इतर ग्राहकांमध्ये विश्वासार्हता आणि पत वाढली आहे.

२०२१ मध्ये युपीएलने नव्या नियमांअंतर्गत ‘वेल- नोन’ ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये ब्रँडच्या विकासाबद्दलचे महत्त्वाचे तपशील, सार्वजनिक मान्यता दर्शवणारे पुरावे आणि त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती समाविष्ट केली होती. तपशीलवार विश्लेषण आणि प्रक्रियेनंतर कंपनीला ‘वेल- नोन ट्रेडमार्क’ टायटलचा दर्जा देण्यात आला.

युपीएल ब्रँडचे स्थान बळकट करण्याबरोबरच या दर्जामुळे कायदेशीर संरक्षण, इतर ब्रँड्सच्या तुलनेत स्पर्धात्मक फायदा, मार्केटिंगचे सुलभ प्रयत्न आणि कंपनीसाठी वाढीव मूल्य मिळणार आहे.

या कामगिरीविषयी युपीएल एसएएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष दोभाल म्हणाले, ‘वेल- नोन ट्रेडमार्कचा दर्जा मिळणे आमच्यासाठी सन्माननीय आहे. यामुळे गुणवत्ता आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दर्जेदार उत्पादन निर्मिती करून त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठीची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. या सन्मानामुळे जगभरातील शेतकऱ्यांना सर्वोत्तम शेतीविषयक सुविधा पुरवण्यातील आमच्या ब्रँडच्या व्याप्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.’

‘वेल- नोन ट्रेडमार्क हे सार्वजनिक पातळीवर अतिशय महत्त्वाचे आणि विशिष्ट उत्पादने व सेवांशी संबंधित ब्रँड दर्शवणारे असते. हा सन्मान इतका दमदार आहे, की वेगवेगळ्या उत्पादनांसाठी अशाच प्रकारचा मार्क वापरणे ग्राहकांची दिशाभूल करणारे व मूळ स्त्रोताबद्दल गोंधळ निर्माण करणारे असू शकते. २०१७ नियमांनी ‘वेल नोन’ स्टेटस मिळवण्यासाठी सुलभ प्रक्रिया तयार केली आहे. कंपन्यांना आयपी ऑफिसवर त्यांच्या ब्रँडचा इतिहास, मान्यतेचा पुरावा आणि संबंधित कागदपत्रे यांसह तपशीलवार अर्ज दाखल करावा लागतो.’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande