टिंडरची 'फर्स्ट टाईम व्होटर्स' मतदान जागरूकता मोहीम
मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) - येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवं मतदारांनी त्यांच्या मतदाना
Tinder 


मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) - येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवं मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क मतदान करून बजावावा, यासाठी तरुणांमध्ये लोकप्रिय ॲप असलेल्या टिंडरने भारतात 'एव्हरी सिंगल व्होट काउन्ट आणि फर्स्ट टाईम व्होटर्स जागरूकता मोहीम सुरू केली आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी तरुण मतदारांना शिक्षित आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम भारतातील आघाडीची युवा माध्यम संस्था युवा आणि मार्क युवर प्रेसेंस ही भारतातील निःपक्षपाती संस्था यांच्या सहकार्याने चालवली जाते. भारत या वर्षी २० दशलक्ष नव मतदार तरुणांसह जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीसाठी सज्ज होत असताना, हा उपक्रम म्हणजे तरुणासाठी भारताच्या लोकशाही उत्सवात सामील होण्याची संधी आहे.

याबाबत मार्क युवर प्रेसेंसचे संस्थापक चैतन्य प्रभू म्हणाले की, “मी टिंडर आणि युवा यांच्यातील भागीदारीबद्दल खूप उत्सुक आहे. आम्ही एकत्रितपणे तरुणांना सक्षम बनवू इच्छितो आणि त्यांच्या राईट टू वोट ला प्रोत्साहन देऊ इच्छितो. आमच्या भावना व्यक्त करण्याची आणि मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करून देऊन, आम्ही केवळ वैयक्तिक सहभागालाच सक्षम करत नाही, तर लाखो लोक या निवडणुकांमध्ये नवं मतदार मते देण्याच्या तयारीत असल्याने एकत्रित मोहिमेला चालना देत आहोत. “टिंडर वापरकर्त्यांपैकी निम्म्याहून अधिक १८ ते २५ वर्षांचे आहेत.”

तरुण प्रौढांना, विशेषत: नव मतदार त्यांच्या मूलभूत नागरी हक्काचा: मतदानाच्या अधिकाराचा पूर्ण लाभ घेण्याची आठवण करून देणारा आहे.

टिंडर बायस वर मतदान या शब्दाचा वापर गेल्या वर्षी भारतात जवळपास ३ पट वाढला आहे, म्हणून टिंडर ने 'वोटिंग पार्टनर निडेड', 'फर्स्ट टाईम वोटर' आणि 'आय वोटेड' सारखे ॲप-मधील मतदान-थीम असलेले स्टिकर्स सादर केले आहेत जे वापरकर्ते तुमच्या प्रोफाइलवर प्रदर्शित करू शकतात. हे स्टिकर्स वापरकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि समविचारी लोकांशी संपर्क साधण्याची परवानगी देतात. १८ एप्रिल ते १५ मे २४ पर्यंत, भारतातील टिंडर वापरकर्ते टिंडरवर ॲपमधील स्वाईप कार्ड्स द्वारे टिंडर वापरकर्त्यांना मार्क युअर प्रेसेंस वेबसाइटवर घेऊन जाते, जिथे त्यांना मतदार नोंदणी आणि प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबद्दल माहिती मिळू शकते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande