गोदरेज ल'अफेअरच्या सहाव्या आवृत्तीचा समारोप
मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) गोदरेज L'Affaire - गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा लक्झरी लाइफस्टाइल प्लॅटफॉर
गोदरेज ल'अफेअरच्या सहाव्या आवृत्तीचा समारोप


मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.) गोदरेज L'Affaire - गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा लक्झरी लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म आणि अन्य सहयोगी कंपन्यांद्वारे 'ऑल थिंग्ज गुडनेस' च्या सहाव्या नेत्रदीपक कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी अनेक प्रमुख व्यक्तींसह 1,500 हून अधिक लोक उपस्थित होते तर 50 हून अधिक ब्रँड्स एकत्र आले होते.

HSBC India ने सादर केलेल्या या कार्यक्रमात गोदरेज L'Affaire चे हायपर-इमर्सिव्ह अनुभव तयार करणे, उत्साही लोकांचा समुदाय एकत्र करणे आणि सर्व सहभागी ब्रँड्ससाठी एक मजबूत डिजिटल सुरक्षा जाळे विणणे हे त्रिस्तरीय मिशन हे याचे प्रमुख उद्दिष्ट होते. या कार्यक्रमात उपस्थितांना याचा अनुभवही मिळाला आणि याचे उपस्थितांनी कौतुकही केले.

सुंदर कमानदार गेटमधून आत प्रवेश टाकल्यापासूनच पाहुण्यांना या कार्यक्रमाचे वेगळेपण जाणवायला लागले. 'गुडनेस ऑफ लाइफस्टाइल' म्हणजे काय, हे त्यांनी पावलोपावली अनुभवले. गुडनेस ऑफ लाइफस्टाइल म्हणजे जगण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन. हा इव्हेंट त्यातील बारकाव्यांसह आठ झोनमध्ये व्यवस्थितपणे मांडण्यात आला होता. L'Affaire चे हे आठ विभाग म्हणजे जीवनशैली, जागरूकता, फॅशन, फ्लेवर, कलाकारी, नावीन्य, बदल आणि पर्यावरण. या प्रत्येकाचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमात उपस्थितांना दिसले. आणि सगळ्यांनी याचा आनंद देखील घेतला.

या कार्यक्रमापूर्वी येणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांना कार्यक्रमात काय असेल, याची खूप उत्सुकता होती. त्यामुळे इव्हेंटच्या 4-5 दिवस आधी लाइव्ह झालेल्या मायक्रोसाइटने पाहुणे वाट पाहत असलेल्या इमर्सिव्ह अनुभवाची झलक दाखवली.

मलायका अरोराचा एक खास फॅशन शो होता, यात तिचा फ्लॅगशिप ब्रँड - द लेबल लाइफ याचे प्रदर्शन केले जात होते. हे या संध्याकाळच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. ब्रँडच्या कलेक्शनसाठी धमाकेदार पदार्पण करताना, मलायकाने पिकनिक, पार्टी, होम आणि ऑफिस लूकवर केंद्रित असलेले स्प्रिंग समर कलेक्शन 2024 प्रदर्शित केले. याशिवाय उपस्थितांना मिकी मॅकक्लेरी - पुरस्कार विजेते गीतकार, संगीतकार आणि निर्माते यांचे ब्रेनचाइल्ड द बारटेंडर या बँडचा देखील आनंद घेता आला. शाल्मली खोलगडे, मेधा साही आणि कप्रिला केशिंग यांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. आणि वातावरण देखील भारून टाकले.

गोदरेज L'Affaire 2024 च्या यशाने उत्साहित होत, तान्या दुबाश, कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सहयोगी कंपन्या म्हणाल्या, गोदरेज ल'अफेयरची सहावी आवृत्ती हा एक संस्मरणीय प्रवास होता. यातूनच क्राफ्टिंगसाठी असलेली आमची बांधिलकी तसेच ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. 'ऑल थिंग्स गुडनेस' ही ग्राहकांसाठी वैयक्तिकृत, इमर्सिव्ह आणि चांगल्या अनुभवाची थीम आहे. जाणीवपूर्वक चांगल्या निवडी आणि समाजासाठी सकारात्मक योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. आणि आता त्यांना पुढच्या वर्षीच्या सातव्या आवृत्तीचे वेध लागले आहेत.

भागीदारीविषयी आपले विचार शेअर करताना, HSBC इंडियाचे ग्राहक प्रस्ताव, डिजिटल आणि मार्केटिंगचे प्रमुख, जसविंदर सोधी म्हणाले, “गोदरेज ल'अफेअरचा प्रवास आम्ही बराच काळ अनुभवत आहोत. त्यांच्या या चैतन्याने भरलेल्या जीवनशैलीचा साक्षीदार होऊन आम्ही खरोखरच प्रभावित झालो. एकत्र येत चांगुलपणा जपण्याचा, साजरा करण्याचा हा कार्यक्रम आम्हाला फार भावला आहे. गोदरेज एल'अफेयर सोबतचे आमचे सहकार्य हे HSBC इंडियाच्या आमच्या ग्राहकांसोबतचे खरे कनेक्शन आणि विश्वास वाढवण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे जुळते. या अनुभवातून, आम्ही उपस्थितांना एका अद्वितीय आणि समृद्ध जीवनशैलीचा अनुभव दिला आहे.”

गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट (GFTR) च्या 7 व्या आवृत्तीचे अनावरण करताना खाद्यप्रेमींना अत्यंत आनंद झाला. प्रोव्हनन्स अशी यावेळची थीम होती. या अंतर्गत भारतीय पाककृती आणि त्याच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकण्यात आला. खाद्यपदार्थांचे घटक, त्यांची प्रादेशिक वैशिष्ट्ये, पद्धती आणि परंपरा यांच्यातील दुवा शोधून काढला. शेफ, ब्लॉगर्स आणि खाद्य उत्पादकांसह 190 हून अधिक तज्ञांच्या मतांसह, GFTR 2024 भारतीय पाककृतीच्या समृद्ध वारशावर प्रकाश टाकते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande