पुणे : कोंढवा परिसरात एनआयएची छापेमारी
एटीएसचे पथकही कारवाईत झाले सहभागी पुणे, 20 एप्रिल (हिं.स.) : पुण्यात आज, शनिवारी सकाळी राष्ट्रीय त
संग्रहित


एटीएसचे पथकही कारवाईत झाले सहभागी

पुणे, 20 एप्रिल (हिं.स.) : पुण्यात आज, शनिवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरात छापे टाकण्यात आले असून दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली होती. यानंतर देशभरात कारवाई करण्यात आली होती. या करवाईत देशातील ‘आयसिस’चे मोड्यूल उघडकीस आले होते. त्यानंतर दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज, शनिवारी पुन्हा कारवाई करण्यात आली असून त्यांनी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा परिसरातील दहशतवाद्यांच्या घरात आज सकाळी ही छापेमारी सुरू करण्यात आली. एनआयएचे काही तपास अधिकारी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. पुण्यात दुचाकी चोरतांना काही दहशतवाद्यांना कोथरूड येथून अटक करण्यात आली होती. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दशहतवाद्यांची नावे होती. तर मोहम्मद शाहनवाज शफिउर रहमान आलम (रा. पेलवल रोड, न्यू महमूदा हाऊस, कटकमसंडी, हजारीबाग, झारखंड) हा पळून गेला होता.

दरम्यान, यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय बाळवल्याने त्यांच्या घराची तपासणी केली असता, अनेक दहशतवादी साहित्य जप्त करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला होता. तसेच अनेक दहशतवाद्यांना अटक करत ‘आयसिस’चे मोड्यूल उद्धवस्त करण्यात आले होते. त्यांची चौकशी सध्या सुरू असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आज छापे टाकण्यात आले होते. पुण्यात राहत असतांना, त्यांनी वापरलेल्या गाड्या आज जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्व दहशतवादी हे ‘अह-उल-सुफा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून त्यांना पुण्यासह देशात अनेक ठिकाणी घातपात करायचचा होता. मात्र, त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांचा कट उधळून लावला होता. पुणे पोलिसांकडून हा तपास एटीएस व त्यानंतर एनआयएकडे आपल्याकडे घेतला होता. 'एनआयए'ने यानंतर त्यांना आर्थिक रसद देणारा आणि त्यांना राहण्यास घर देणारा कातिल दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर (वय 32, रा. कोंढवा) याला देखील अटक केली होती. तर यानंतर अभियंता असलेला सीमाब नसरुद्दीन काझी (वय 27, सध्या रा. कोंढवा) याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली होती. यानंतर ल्फिकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ (रा. पडघा, जि. ठाणे) याला टेरर फंडींग प्रकरणी अटक केलीय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande