निवडणूक रोख्यांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपास पथकामार्फ
संग्रहित


नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.

ईडी, सीबीआयकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असे याचिकेत म्हटले आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पध्दत घटनाबाह्य असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार हा देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असे याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande