सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम प्रकरणी निकाल राखून ठेवला
नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या संदर्भातील
संग्रहित


नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या संदर्भातील सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवलाय. केवळ संशयाच्या आधारे निकाल देऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

ईव्हीएम प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. दीपांकर दत्ता म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय आहे या आधारावर आम्ही आदेश कसा द्यायचा? जो अहवाल आम्हाला देण्यात आला आहे त्यानुसार ईव्हीएम हॅक केल्याची किंवा त्यात काही गडबड केल्याची एकही घटना घडलेली नाही. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यावर आमचे नियंत्रण नाही. काही सुधारणा हव्या असतील तर आम्ही त्या सुधारा हे सांगू शकतो. तर न्या. संजीव खन्ना म्हणाले की आम्ही निवडणूक आयोगाला दुसरा प्रोग्राम या ईव्हीएममध्ये फीड केला जाऊ शकतो का? हे विचारले होते. त्यावर निवडणूक आयोगाने असे काहीही होऊ शकत नसल्याचे म्हंटले होते. आता या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande