देश शरियाने नव्हे यूसीसीवर चालेल- अमित शाह
ग्वाल्हेर, 26 एप्रिल (हिं.स.) : देश शरियाने नव्हे तर समान नागरी कायद्याने (यूसीसी) चालेल असे प्रतिपा
अमित शाह


ग्वाल्हेर, 26 एप्रिल (हिं.स.) : देश शरियाने नव्हे तर समान नागरी कायद्याने (यूसीसी) चालेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. गुना लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी शाह म्हणाले की, काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष असून अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने 70 वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम 370 वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम 370 रद्द केले, असे अमित शहा यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. भाजपने उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल असे शाह म्हणालेत. पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी देशात 1 कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक 3 कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी 10 वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केल्याचे शाह यांनी यावेळी नमूद केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande