राज्यात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) : राज्यात आज, शुक्रवारी वर्धा, अकोला, अ
संग्रहित


निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) : राज्यात आज, शुक्रवारी वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी राज्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. या मुळे मतदान ठप्प झाले होते. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान रखडले होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. तर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातील वर्धा, अमरावती, अकोला, हिंगोली येथे ईव्हीएम बंद पाडल्याच्या घटना घडल्या. अमरावतीत रुक्मिणीनगर शाळा क्रमांक 19 मधील खोली क्रमांक 5 मध्ये ईव्हीएम बंद पडले. तब्बल 15 मिनिटे येथील वोटिंग मशीन बंद पडले. यमुळे येथील मतदान रखडले. काही वेळाने मशीन मधील बिघाड दुरुस्त झाला. यानंतर येथील मतदान सुरळीत सुरू झाले. वडरपुरा भागातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. या केंद्रात 3 खोल्या आहेत. त्यापैकी खोली क्रमांत 1 मधील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले होते.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही देखील काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला. उमरा येथील बुथ क्रमांक 333 वर मतदान यंत्र बंद पडले. येथील मतदान 7.30 वाजेपर्यंत खोळंबले होते. ईव्हीएम बदलण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातटाकळी येथेही मतदान यंत्र बंद पडले. तब्बल 1 तास हे ईव्हीएम बंद होते. यामुळे तासभर मतदार रांगेतच उभे होते. यामुळे केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. एक तासानंतर येथील ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त करण्यात आला. यानंतर मतदान सुरळीत पार पडले.वर्धा जिल्ह्यातील टाकली येथील तर देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या 185 क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी मतदान यंत्रे बंद पडले. याचा फटका खासदार रामदास तडस यांना बसला. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे त्यांना 40 मिनिटे रांगेत उभे रहावे लागले.

नांदेडच्या मतदान केंद्र क्रमांक 5 वरील ईव्हीएम मशीन बंद झाले होते. तासाभरापासून मतदान केंद्र बंद होते. याचा फटका मतदारांना बसला. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासात मतदान प्रक्रिया खोळंबली होती. हिंगोलीत 39 बॅलेट मशीन आणि 16 कंट्रोल युनिट बदलले. तर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या. एकूण 39 हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांत मतदानात अडथळा आला. सकाळच्या टप्प्यात तापमान कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मतदान रखडल्यामुळे मतदार ताटकळले होते. यामुळे मतदानाचा टक्का घसरला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande