सुरतच्या निवडणुकीत 'नोटा'ला उमेदवार मानण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका नवी दिल्ली,26 एप्रिल (हिं.स.) : गुजरातच्या सुरत येथे स्प
संग्रहित


सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका

नवी दिल्ली,26 एप्रिल (हिं.स.) : गुजरातच्या सुरत येथे स्पर्धेत कुणीच नसल्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. परंतु, आता शिव खेडा यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ‘नोटा’ला उमेदवार मानण्याची मागणी केलीय. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरातच्या सुरत येथे निवडणूक उमेदवारी अर्जाच्या छाननीत काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणींचा अर्ज बाद झाला. तर इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल अविरोध निवडून आलेत. मात्र, आता या बिनविरोध निवडणुकीमुळे नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. सुरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत सूरतमध्येनिवडणूक बिनविरोध जिंकण्याची परिस्थिती टाळण्यासाठी 'नोटा'चा उमेदवार म्हणून विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. ‘नोटा’ला उमेदवार मानले जावे आणि ‘नोटा’ला जर विजयी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जर एखाद्या उमेदवाराला ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली तर त्याला 5 वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande