मुंबई ते दानापुर/गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या
मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगाम
मुंबई ते दानापुर/गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या


मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापुर/गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापुर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष (४ फेऱ्या)

01107 वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ३०.०४.२०२४ आणि दि. ०४.०५.२०२४ रोजी २३.२० वाजता सुटेल आणि दानापुर येथे तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01108 वातानुकूलित विशेष दानापुर येथून दि. ०२.०५.२०२४ आणि दि. ०६.०५.२०२४ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना : १५ वातानुकूलित -तृतीय-इकॉनॉमी, एक सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (१७ डब्बे)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष (४ फेऱ्या)

01109 वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २८.०४.२०२४ आणि दि. ०२.०५.२०२४ रोजी २३.५० वाजता सुटेल आणि गोरखपुर येथे तिसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01110 वातानुकूलित विशेष गोरखपुर येथून दि. ३०.०४.२०२४ आणि दि. ०४.०५.२०२४ रोजी ११.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसऱ्या दिवशी २३.१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

संरचना : १५ वातानुकूलित-तृतीय-इकॉनॉमी, आणि २ जनरेटर कार. (१७ डब्बे)

आरक्षण : 01107 आणि 01109 वातानुकूलित विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. २७.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande