व्हॉटसऍपने दिला भारत सोडून जाण्याचा इशारा
नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : माहिती तंत्रज्ञान कायद्याला दिलेल्या आव्हानासंदर्भात दिल्ली उच्च न्
संग्रहित


नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : माहिती तंत्रज्ञान कायद्याला दिलेल्या आव्हानासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान व्हॉटसऍपने भारत सोडून जाण्याचा इशारा दिलाय. आम्हाला एनस्क्रिप्शन सुविधेतील आशय उघड करायला सांगितल्यास व्हॉट्सअॅप भारतातून निघून जाईल असे म्हंटले आहे.

भारत सरकारने 21 मार्च 2021 रोजी जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञान नियमावलीमधील तरतुदींना व्हॉट्सअॅप व तिची पालक कंपनी फेसबुकने (आताची मेटा) न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातील न्या. मनमोहन आणि न्या. मनमीत प्रितमसिंग अरोरा यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी व्हॉटसऍपतर्फे युक्तीवाद करणारे ऍड्. तेजस कारिया यांनी कोर्टाला सांगितले की, आम्हाला एनस्क्रिप्शन सुविधेतील आशय उघड करायला सांगितल्यास व्हॉट्सअॅप भारतातून निघून जाईल. व्हॉट्सअॅपने न्यायालयाला सांगितले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर पाठविण्यात आलेला संदेशांचा ते पाठविणाऱ्याला व ज्याला तो संदेश मिळाला ती व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही माग काढता येणार नाही. संदेश पाठविणाऱ्यांचा खासगीपणा जपला जावा यासाठीच एंड-टू-एंड एनस्क्रिप्शनची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली आहे. आपला खासगीपणा जपला जातो आहे याची खात्री पटल्यानेच लोक या सुविधेचा वापर करत आहेत, असे ऍड. तेजस कारिया यांनी न्यायालयाला सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande