पुणे - नेट परीक्षा पुन्हा ऑफलाइन
पुणे, 18 मे, (हिं.स) विद्यापीठे व महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्र
पुणे - नेट परीक्षा पुन्हा ऑफलाइन


पुणे, 18 मे, (हिं.स) विद्यापीठे व महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’ परीक्षा आता पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने होत आहे. परंतु सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने यापुढची सेट परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. परंतु आता नेट परीक्षाच ऑफलइनद्वारे होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून आता सेट परीक्षा ऑनलाइन, की ऑफलाइन घेतली जाणार आहे, याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे नेट परीक्षा देशभरात घेतली जाते. येत्या जूनमध्ये होणारी नेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट परीक्षेबाबत अनेक मोठे बदल केले आहेत. पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही आता नेट परीक्षा देणार आहेत.तसेच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा देशभरातून नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. परिणामी सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे अडचणीचे ठरू शकते. त्या पार्श्वभूमीवर एनटीएने नेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande