चंद्रपूरात शनिवारी शाळा, महाविद्यालये बंद
चंद्रपूर, 26 जुलै (हिं.स.)। प्रादेशिक हवामान खात्याने शनिवारी जिल्ह्यासाठी 'ऑरेज अलर्ट' दिलेला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये २७ जुलै २०२४ रोजी बं
चंद्रपूरात शनिवारी शाळा, महाविद्यालये बंद


चंद्रपूर, 26 जुलै (हिं.स.)। प्रादेशिक हवामान खात्याने शनिवारी जिल्ह्यासाठी 'ऑरेज अलर्ट' दिलेला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये २७ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना २७ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव / सुधांशू जोशी


 rajesh pande