मतदार नावनोंदणीसाठी शनिवारपर्यंत सुवर्णसंधी
हिंगोली, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी शनिवार (दि.१९) पर्यंत सुवर्णसंधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून, आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप,
मतदार नावनोंदणीसाठी शनिवारपर्यंत सुवर्णसंधी


हिंगोली, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी शनिवार (दि.१९) पर्यंत सुवर्णसंधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून, आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप, वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज क्र ६ करू शकता. तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनची मदत घेता येणार आहे.

मतदानाची अंतिम यादी पूर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केली नाही, त्या सर्वांनी आपले नाव पुढील दोन दिवसात मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

1 ऑक्टोबरपर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले तरूणही मतदार होण्यास पात्र आहेत. त्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर राज्यातही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून, हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाचे मतदान होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आपले मतदान कुठे शोधून ठेवा

ऐन निवडणुकीच्या दिवशी आपले मतदान यादीत नाव नसल्याचा शोध अनेकांना लागतो. आपले मतदान केंद्र बदले असल्याचे कळते. मात्र यासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे, मतदार यादीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. आपल्या मोबाइलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून आपणास याबाबतची माहिती मिळू शकते. तसेच वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण तपासणी करू शकता. घरातील तरुणांनी ज्येष्ठांनाही यासंदर्भात मदत करावी. आपल्या घरातील पात्र मतदारांची नावे कुठे आहेत हे तपासून घ्यावीत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande