अग्निवीरांसाठी आता पोलिस सेवेतही आरक्षण
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात आरक्षण मिळणार नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.) : कारगिल विजय दिवसानिमित्त उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने अग्निशमन दलासाठी मोठी बातमी दिली आहे. दोन्ही राज्यांमध्ये आता माजी अग्निवीरांना पोलिस भरतीत आरक्षण दिले जाणार आह
संग्रहित


मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात आरक्षण मिळणार

नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.) : कारगिल विजय दिवसानिमित्त उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने अग्निशमन दलासाठी मोठी बातमी दिली आहे. दोन्ही राज्यांमध्ये आता माजी अग्निवीरांना पोलिस भरतीत आरक्षण दिले जाणार आहे.

यापूर्वी सीआयएसएफ, आरपीएफ, बीएसएफ आणि सीआरपीएफमध्ये आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच आता दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोलिस भरतीतही माजी अग्निवीरांना अरक्षण दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा अग्निवीर त्याच्या सेवेनंतर परत येईल तेव्हा त्याला राज्य पोलिस सेवेत आरक्षण दिले जाईल. त्याचवेळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही हेच सांगितले आहे. पोलीस आणि सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये राज्य सरकार अग्निवीर सैनिकांना आरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधक अग्निवीर योजनेवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, कोणताही देश आणि समाज पुढे जाण्यासाठी वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक असते. आपण राष्ट्रीय सुरक्षेला तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे योगींनी सांगितले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, आज कारगिल दिनानिमित्त आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार अग्निवीर सैनिकांना पोलीस आणि सशस्त्र दलांच्या भरतीमध्ये आरक्षण दिले जाईल असे यादव यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande