उत्तरप्रदेश : इमारत कोसळून चौघांचा मृत्यू
लखनऊ, 07 सप्टेंबर (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे आज, शनिवारी 3 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय. याठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त रोशन जेकब यांनी दिली. लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप बिल्डि
उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे इमारत कोसळली


लखनऊ, 07 सप्टेंबर (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे आज, शनिवारी 3 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय. याठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त रोशन जेकब यांनी दिली.

लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप बिल्डिंगमध्‍ये औषधांची खरेदी-विक्री होते. शनिवारी संध्याकाळी ही इमारत कोसळली. घटनास्‍थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकार्‍यांनी धाव घेतली. यासोबतच जिल्हाधिकारी गंगवार देखील घटनास्थळी पोहचले. या अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून 30 जणांची सुटका करण्यात आलीय. यापैकी 27 जखमींना लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्‍यान, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर दु:ख व्‍यक्‍त केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande