अजिंक्य नाईक यांनी घेतली डॉ.श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट
मुंबई, 26 जुलै (हिं.स.) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बहुमताने निवड झाली. आज अजिंक्य नाईक यांनी वर्षा निवासस्थानी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची निवड झाल्याबद्द
नाईक


मुंबई, 26 जुलै (हिं.स.) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बहुमताने निवड झाली. आज अजिंक्य नाईक यांनी वर्षा निवासस्थानी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande