पुणे, 1 ऑगस्ट, (हिं.स.) - पिंपरी येथील एसास कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रवर्तक शाहजाद अख्तर अनिसुद्दीन, वय ः 51, राहणार ः 103/104 नेहरुनगर, पिंपरी हे तक्रारदार असून त्यांनी केलेल्या दि.12/12/2016 रोजी झालेल्या नोटरी करारनाम्यानुसार आरोपी विजया नामदेव पडवळ, पती नामदेव बबन पडवळ यांना दस्तनोंद करून देण्याचे कोणतेही अधिकार नसताना शाहजाद अनिसुद्दीन यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने, शिवराम हाईट्स स.नं.5244 खराळवाडी, येथील एकूण क्षेत्रफळ 6500 चौ.मी. या क्षेत्रावर रॉयल बिल्डर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शिवराम हाईट्स या प्रकल्पातील एकूण 10 फ्लॅटची अप्रामाणिकपणे कपटाने विक्री करून सुमारे 2 कोटी 77 लाख 3 हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पडवळ दाम्पत्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे. पोलीसांनी भारतीय दंड संहिता 1860 नुसार 406, 418, 420, 421, 465, 467, 468, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार बांधकाम व्यवसायिक शाहजाद अनिसुद्दीन यांनी म्हटले आहे की, जमीन विकसनाबाबत माझे ओळखीचे शोएब मुजावर यांनी 2016 रोजी म्हणाले, पिंपरी, खराळवाडी येथे रॉयल बिल्डर यांनी शिवराम हाईट्स स.नं.5244 येथे सन 2014 मध्ये सुरु केले आहे. परंतु, रॉयल बिल्डर यांस शिवराम हाईट्सचा प्रकल्प दुसर्या व्यक्तिस चालवायला द्यायचा आहे. प्रकल्पाबाबत माहिती घेऊन रॉयल बिल्डरचे भागीदार नामदेव बबन पडवळ व विजया नामदेव पडवळ या दाम्पत्याची भेट घेतली त्यांनी मला सांगितले की, त्यांच्याकडे कोणते भांडवल नसल्याने कोणी ग्राहक बिल्डींगमधील फ्लॅट घेण्यास इच्छुक नाही. या प्रकल्पाचे काम माझ्या हाती घेवून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
रॉयल बिल्डरचे भागीदार विजया नामदेव पडवळ व नामदेव बबन पडवळ जागेचे मूळ मालक अशोक शिवराम नलावडे व इतर नलावडे कुटूंब यांच्याकडून विकसनासाठी दि.22/08/2016 रोजी नोटरी करून विनामोबदला संमती/मान्यतापत्र लिहून देण्यात आले. दि.22/08/2016 रोजी लिहून देण्यात आलेल्या विनामोबदला संमती/मान्यतापत्रानुसार रॉयल बिल्डर पडवळ व एसास कंन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे मी, (शाहजाद अनिसुद्दीन) स्वतःचे नावे शिवराम हाईट्स प्रकल्पातील पहिल्या मजल्यावर 101 व 102 दुसर्या मजल्यावर 201 व 202, तिसर्या मजल्यावर 301, 302 चौथ्या मजल्यावर 401, 404, 405, पाचव्या मजल्यावर 501, 504 आणि सहाव्या मजल्यावरील संपूर्ण बांधकाम मला मिळणार होते. उर्वरित बांधकाम जागेचे मूळ मालक अशोक शिवराम नलावडे व इतर नलावडे कुटूंब (सर्वे नं.5244 खराळवाडी क्षेत्र 6500 स्क्वे.फुट) यांना मिळणार होते.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु / मेघा माने / हर्षदा गावकर