सराफा व्यावसायिकाला मारहाण करून रोकडसह चांदी लंपास
जळगाव, 7 जानेवारी, (हिं.स.) शहरातील पिंप्राळा बाजार परिसरातील ‘साई अलंकार’ या सराफा दुकानात शिरून तीन जणांनी व्यावसायिकाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. हल्लेखोरांनी भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा जसवीन यांना मारहाण करत दुकानातून ८ हजार रुपय
सराफा व्यावसायिकाला मारहाण करून रोकडसह चांदी लंपास


जळगाव, 7 जानेवारी, (हिं.स.) शहरातील पिंप्राळा बाजार परिसरातील ‘साई अलंकार’ या सराफा दुकानात शिरून तीन जणांनी व्यावसायिकाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. हल्लेखोरांनी भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा जसवीन यांना मारहाण करत दुकानातून ८ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दांडेकरनगरचे रहिवासी भगवान हरि विसपुते यांचे पिंप्राळा परिसरात सोने-चांदीचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा दुकानात असताना गोलू उर्फ नितेश जाधव, यश पाटील आणि विशाल पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हे तिघे जण दुकानात घुसले. या तिघांनी विसपुते पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि काउंटरमधील रोख रकमेसह चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी भगवान विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande