लालू यादव यांच्यावर मुंबईत यशस्वी ऍन्जिओप्लास्टी
मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात यशस्वी ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली. ब्लॉकेजेसमुळे लालू यादव यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आ
लालू यादव


मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात यशस्वी ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली. ब्लॉकेजेसमुळे लालू यादव यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. ऍन्जिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसात रुग्णालयातून सुटी देण्यात येईल असे सांगण्यात आले.

याबाबत एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लालू प्रसाद यादव गेल्या मंगळवारी पाटणाहून मुंबईत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ते नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणार आहेत. लालू प्रसाद यादव यांचे 10 वर्षांपूर्वी याच रुग्णालयात हृदयाचे ऑपरेशन झाले होते. ही शस्त्रक्रिया सुमारे 6 तास चालली होती. यानंतर लालू प्रसाद यादव 2018 आणि 2023 मध्ये चेकअपसाठी दोनदा मुंबईला आले होते.लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आली होती. तेव्हापासून ते घरीच आराम करीत आहेत.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande