डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडामध्ये जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचाव
फ्लोरिडा, १६ सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी (१४ सप्टेंबर) फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्सवर गोळीबार झाला, त्यातून ते थोडक्यात बचावले. जुलै महि
डोनॉल्ड ट्रम्प


फ्लोरिडा, १६ सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी (१४ सप्टेंबर) फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्सवर गोळीबार झाला, त्यातून ते थोडक्यात बचावले. जुलै महिन्यानंतर ट्रम्प यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) या घटनेला ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न मानले आहे. हल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. ट्रम्प हेच लक्ष्य होते का, याबद्दल स्पष्टता नसून, गोल्फ कोर्सजवळ झालेल्या एका वादातून दोन व्यक्तींमध्ये झालेल्या गोळीबाराची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही माहिती अधिकृत नाही. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्यापासून काही मीटर अंतरावर एक व्यक्ती AK-47 रायफलसह उभा असल्याचे पाहिले. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीवर गोळीबार केला. हल्लेखोराने आपले शस्त्र खाली टाकले आणि एसयूव्हीमधून पळून गेला. काही वेळातच त्याला अटक करण्यात आली. हल्लेखोराचे नाव रायन वेस्ली रुथ असल्याचे कळते. तो माजी बांधकाम कामगार असून त्याची लष्करी पार्श्वभूमी नाही, परंतु त्याने युक्रेन-रशिया युद्धात सहभागी होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. २०२२ मध्ये ट्विटरवर त्याने युक्रेनमध्ये लढण्याची आणि मरण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या विशेषतः २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षिततेबद्दल आनंद व्यक्त केला, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित असल्याचे समजले, त्याबद्दल मला आनंद आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे अमेरिकन राजकारणातील ध्रुवीकरण अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande