पुणे फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री वैजयंतीमालांवरील गीते व नृत्य सादर
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ‘जुलमी संघ आख लडी’, ‘नील गगन की छाव मे’, ‘दिल पुकारे आरे आरे’, ‘दिल तडप तडप’ अशा बहारदार गाण्यांना वन्समोअर मिळत राहिला आणि आपल्या लयबद्ध व वेगवान नृत्याविष्कारातून कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या मनात कायमचा स्थान मिळवणाऱ्या
आम्रपाली


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

‘जुलमी संघ आख लडी’, ‘नील गगन की छाव मे’, ‘दिल पुकारे आरे आरे’, ‘दिल तडप तडप’ अशा बहारदार गाण्यांना वन्समोअर मिळत राहिला आणि आपल्या लयबद्ध व वेगवान नृत्याविष्कारातून कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या मनात कायमचा स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांवर आधारित ‘आम्रपाली’ हा विशेष संगीत व नृत्य कार्यक्रम पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला. अभिनेत्री वैजयंतीमाला यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन पुणे फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले होते. प्रख्यात गायिका गीतांजली जेधे यांनी या कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.

प्रख्यात गायिका गीतांजली जेधे आणि प्रसिद्ध गायक हिंमत कुमार पंड्या यांनी सदाबहार गीते सादर केली. त्यांना प्रज्ञा खरात, अश्विनी बिरारी, ज्योती साळुंखे यांनी गायन साथ दिली. वाद्यसंगत अभिजीत भदे, मिहीर भडकमकर, नितीन दोशी, रोहित जाधव, रोहित साने, केविन, सचिन वाघमारे, हार्दिक रावल, रशीद शेख आणि सुनील गायकवाड यांनी केले. या गायकांसमवेत भरतनाट्यम नृत्यांगना रमा वाळिंबे आणि स्वाती धोकटे यांनी नृत्य सादर केली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोक कुमार सराफ, प्रवीण सराफ, महावीर जैन कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष युवराज शहा, शाहू विद्यामंदिरचे व लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अंकलकोटे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन अनुराधा भारती यांनी केले.

याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande