पुणे फेस्टिव्हलमध्ये हास्यकल्लोळची धम्माल !
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ३६व्या पुणे फेस्टिव्हलच्या अंतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंचावर 'हास्यकल्लोळ धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची' या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रसिका वेंगु
हास्यकल्लोळ धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

३६व्या पुणे फेस्टिव्हलच्या अंतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंचावर 'हास्यकल्लोळ धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची' या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर यांनी आपल्या हास्याने रंगमंचावर अक्षरशः हशाचा कल्लोळ निर्माण केला. प्रेक्षकांच्या हास्यध्वनीने संपूर्ण हॉल दणाणून गेला.

विनोदी अभिनयासोबतच ऑर्केस्ट्रा म्युझिक बँड, दोन गायक आणि वादकांनी कार्यक्रमात संगीताची रंगत वाढवली. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि संपूर्ण हॉल हसण्या-खिदळण्याने भरून गेला. हा कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलच्या सांस्कृतिकj वैविध्याचे एक प्रमुख आकर्षण ठरला. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande