पुणे फेस्टिव्हलमध्ये महान कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘वक़्त ने किया क्या हसी सीतम’, ‘किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार’, ‘ये गलियाँ ये चौबारा’, ‘लग जा गले’, ‘सिमटी सी’ अशा अनेक सुमधुर गाण्यांनी बहरलेला ‘लिजंट्स ऑफ बॉलीवूड’ हा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगं
लिजंट्स ऑफ बॉलीवूड


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘वक़्त ने किया क्या हसी सीतम’, ‘किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार’, ‘ये गलियाँ ये चौबारा’, ‘लग जा गले’, ‘सिमटी सी’ अशा अनेक सुमधुर गाण्यांनी बहरलेला ‘लिजंट्स ऑफ बॉलीवूड’ हा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात सादर झालेला कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिला. ज्येष्ठ पार्श्व गायक मोहम्मद रफी, ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन आणि ज्येष्ठ अभिनेते राज कपूर व गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या संगीत व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महक पुणे संस्थेच्या प्रख्यात गायिका मनीषा निश्चल आणि पायलवृंद संस्थेच्या निकिता मोघे यांनी या कार्यक्रम सादर केला. याची निर्मिती मनीषा निश्चल यांनी केली असून गायक मनीषा निश्चल आणि मकरंद पाटणकर होते. पायलवृंद संस्थेच्या कलाकार नमितो नवले, पूजा खिवंसरा, वैष्णवी मंधलकर, मानसी देवकुळे, गौरव डोंगरे, अजय कणसे आणि अनिकेत सुतार यांनी गाण्यांवर आधारित नृत्य सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन मनिष गोखले यांनी केले. अमान सय्यद, अमोल कांगारे, नितिन शिंदे, अभिजीत भदे आणि मास्टर मोहनिश यांनी वाद्यसंगत केली. येतील अनेक गाण्यांना प्रेक्षकांने वन्समोअर दिले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आणि मोहन टिल्लू यांनी कलाकारांचे सत्कार केले.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande