महामंडळांवर शिंदे गटाच्या नेत्यांची वर्णी, भाजप-राष्ट्रवादीच्या वाट्याला तूर्तास एकही नाही
मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे टप्प्याटप्प्याने महामंडळाचे वाटप सुरू आहे. यामध्ये आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन
महायुती


मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे टप्प्याटप्प्याने महामंडळाचे वाटप सुरू आहे. यामध्ये आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद, तर आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मात्र यात तूर्तास भाजप किंवा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या एकाही नेत्याची वर्णी लागली नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना महामंडळाचे वाटप होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवारांच्या वाट्याला काहीच न आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा योग्य सन्मान होणार असल्याचा विश्वास आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला देखील महामंडळ येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande