पुण्यातून वंदे मेट्रो सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार - मुरलीधर मोहोळ
- मोदी सरकारचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य! पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.) - मोदी सरकारचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य राहिले आहे. पुण्यातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणखी बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे-लोणावळा तिसरी-चौथी लाईनचे काम लवकरच सुरू कर
मुरलीधर मोहोळ


- मोदी सरकारचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य!

पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.) - मोदी सरकारचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य राहिले आहे. पुण्यातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणखी बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे-लोणावळा तिसरी-चौथी लाईनचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. देशात आगामी काळात दोन मोठ्या शहरांच्या अंतर्गत वंदे मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर या मार्गांवर वंदे मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. याशिवाय, उरळी कांचन येथील रेल्वे टर्मिनल, कर्जत-कामशेत, कर्जत-तळेगाव दरम्यान दोन नवे रेल्वे मार्ग प्रस्तावित असून ही कामे पूर्ण झाल्यास पुणे-मुंबई हे अंतर केवळ दोन तासांवर येईल, असेही मोहोळ यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात हिरवा झेंडा दाखवल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे-कोल्हापूर, पुणे-हुबळीसह देशभरातील 6 मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन पुणे रेल्वे स्थानक येथे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय मुरलीधर मोहोळ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कायमच सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून विकासकामे करते. गेल्या 10 वर्षांत देशभरात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांचे जाळे पाहिल्यास आपल्याला याची प्रचिती येईल. आतापर्यंत 23 लाख 61 हजार 191 कोटी रुपयांची रेल्वेची कामे झाली असून 1064 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. पूर्वीच्या 40-50 वर्षांतही झाले नाही इतके काम गेल्या 10 वर्षांत झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य असल्याचे मत यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. याबाबत सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संभाजीनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगलीसह अनेक रेल्वे स्थानकांमध्ये विकास प्रकल्प सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande