राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -29 झाला पूर्णपणे ठप्प
कोहिमा, 04 सप्टेंबर (हिं.स.) : नागालँडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे राष्ट्रीय महामार्ग-29 वर भूस्खलन होऊन 6 जण मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे दिमापूर-कोहिमा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आपत्कालीन बैठक बोलावून एनएच-29 वरील आपत्तीच्या परिस्थितीचा आढावा घेतला, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला मृतांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हंटले आहे. या अपघातात ख्रिसांगुली (46), समीर दत्ता (43), अन्हियु (57, महिला), दाजू (60), सोपोन बिस्वास (32) आणि विजय (28) यांचा मृत्यू झालाय. या भूस्खलनानंतर अत्यावश्यक वस्तू आणि इंधनाच्या संभाव्य तुटवड्याबद्दल वाढणाऱ्या चिंतेकडे लक्ष वेधण्यासाठी तातडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्ग-29 चा काही भाग भूस्खलनामुळे बाधित झाला असूनही सध्या जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचा तुटवडा नाही. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी