सिंधुदुर्ग - दारूसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई सिंधुदुर्ग, 4 सप्टेंबर (हिं.स.)। बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुंदन (व
जप्त केलेला मुद्देमाल आणि संशयितांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी.


राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

सिंधुदुर्ग, 4 सप्टेंबर (हिं.स.)। बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुंदन (वय २६, रा. धार, मध्यप्रदेश) व टोनी मोरोइएस (वय ४८, रा. मडगाव-गोवा) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादक शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका येथे वाहनाची तपासणी करत असताना गोवा बनवण्याची दारू आढळून आली. या प्रकरणी कुंदन व टोनी या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३३ लाखाच्या दारूसह १७ लाखाची गाडी व १२ हजाराचा मोबाईल असा एकूण ५० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे, जगन चव्हाण आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande