जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
जळगाव , 9 मे, (हिं.स.)एकीकडे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून त्यातच जळगाव शहरात कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन महिलांची सुटका दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब
जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा


जळगाव , 9 मे, (हिं.स.)एकीकडे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून त्यातच जळगाव शहरात कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन महिलांची सुटका दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिपेठ पोलिसांनी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह एक असे 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर येतील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत. तर, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande